‘त्याने खूप जीव लावला, मी त्याची साथ कशी सोडू?’ सक्षमच्या हत्येनंतर आचल, म्हणाली, मी पळून जायचा
नांदेड मर्डर लव्ह स्टोरी: नांदेडच्या इतवारा परिसरातील प्रेमप्रकरण आणि जातीय विखारातून सक्षम ताटे (वय 20) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सक्षम ताटे याचे आचल मामीडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र, जात वेगळी असल्यामुळे आचलच्या कुटुंबीयांचा या दोघांच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. याच वादातून आचलचे वडील गजानन मामीडवार, भाऊ साहिल मामीडवार आणि हिमेश मामीडवार या तिघांनी गोळ्या घालून आणि फरशी व दगडाने मारुन सक्षम ताटे याची हत्या (Nanded Murder) केली होती. सक्षम ताटे आणि मामीडवार कुटुंबीय हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. सक्षम ताटे काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटला होता. गजानन मामीडवार यांनी सक्षमला त्यांच्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र, सक्षम आणि आंचल यांचे प्रेमप्रकरण सुरु राहिलेया मामीडकर कुटुंबीयांनी गुरुवारी त्याला संपवले होते. (Nanded girl weds with boyfriend dead body)
आंतरजातीय प्रेमातून झालेल्या या संतापजनक घटनेनंतर सक्षमची प्रेयसी आचल मामीलवाड हिने सक्षमच्या मृतदेहाशीच लग्न केलं आता तिने या दुर्दैवी घटनेमागील संपूर्ण पार्श्वभूमी सांगितली आहे, आचलने रडत रडत सांगितले की, सक्षम आणि तिचे प्रेम गेल्या तीन वर्षांपासून होते. जेव्हा तिच्या घरच्यांना याबद्दल समजलं, तेव्हा त्यांनी विरोध सुरू केला. आचलने सक्षमला अनेकदा पळून जाऊन लग्न करण्याचा सल्ला दिला होता. पण सक्षमने त्याला ठाम नकार दिला. तो म्हणाला, “मी तुझ्या वडिलांची खूप इज्जत करतो. मी त्यांना मनवेन आणि तुला सन्मानाने घरी नेईन.” त्याच्या याच समजूतदारपणामुळे आणि वडिलांवरील आदरामुळे त्याने पळून जाण्याचा मार्ग नाकारला होता, असे आचलने सांगितले.
Nanded Murder Love Story: खोट्या गुन्ह्यांची धमकी अन् विनयभंगाची खोटी तक्रार
आचलच्या कुटुंबीयांना त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळताच आचलवर प्रचंड दबाव टाकला. तिला धमकावून, शस्त्राचा धाक दाखवून सक्षमविरोधात विनयभंगाची खोटी तक्रार देण्यास भाग पाडले. “तू तक्रार दिली नाहीस तर आम्ही सक्षमला मारून टाकू,” अशी धमकी तिला देण्यात आली होती. मात्र, १८ वर्षे पूर्ण होताच आचलने स्वतः न्यायालयात जाऊन सक्षमच्या बाजूने साक्ष दिली होती. याच खोट्या गुन्ह्यामुळे सक्षमवर एमपीडीएची कारवाई झाली होती, पण तो गुन्हेगार नव्हता. “माझ्यामुळे त्यांचा मुलगा गेला, आता मी त्यांच्या परिवाराची साथ सोडणार नाही,” असा निर्धार आचलने व्यक्त केला आहे. सक्षमच्या आईनेही आचलला आपली मुलगी मानून तिचा स्वीकार केला.
Nanded Murder Love Story: त्या दिवशी नेमकं काय घडलं? सक्षमच्या आईने सांगितली आपबिती
या घटनेनंतर सक्षमची आई संगीता ताटे (वय 40) यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. सक्षमच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याची हत्या किती निर्घृणपणे केली आहे, हे नमूद करण्यात आले आहे. सक्षमच्या आईने पोलीस जबाबात म्हटले आहे की, गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता माझा मुलगा शिवम याचा मला फोन आला व त्याने मला सांगितले की, आई व बाबा घरी असताना आपल्या घरी हिमेश मामीडवार व त्याचे सोबत सोमेश सुभाष लखे, वेदांत अशोक कुंदेकर व इतर दोन जण घरी आले व त्यांने सक्षम घरी आहे का ? म्हणून विचारले. सक्षम भाऊ घरी नसल्याने आम्ही त्याला तो घरी नाही म्हणून सांगितले. हे ऐकून मला वाटले की, ते एखाद्या कामानिमीत्त आले असतील. त्यानंतर शिवंमने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास परत फोन केला व त्यांनी कळविले की, आई सक्षम भाऊला मिलींद नगर, येथील बाळु कचरु जोंधळे यांच्या घरासमोर गजानन मामीडवार, साहिल मामीडवार व हिमेश मामीडवार यांनी मारहाण केली आहे. ‘तू लवकर ये’, असे कळविल्याने मी लगेच मिलींदनगर येथे जाऊन पाहिले असता तेथे माझा मुलगा सक्षम ताटे हा जखमी अवस्थेत पडला होता. त्याच्या डोक्याला आणि तोंडाला मार लागून डोक्यातून मेंदु बाहेर आला होता. बाजुला फरशीचा तुकडा रक्ताने भरुन पडला होता. तसेच कपाळावर बंदुकीची गोळी लागल्यासारखी जखम होती व गोळीच्या पुंगळ्या देखील तेथे पडल्या होत्या. त्यानंतर तेथे पोलीस आले व सक्षमला अॅम्ब्युलन्सने दवाखान्यात नेले, असे सक्षमच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
माझे पती गेल्या दोन वर्षांपासून आजारी आहेत. मी वजीराबाद येथील कापड दुकानावर काम करते. मला शिवम आणि सक्षम ही दोन मुलं आहेत. सक्षम माझा मोठा मुलगा होता, तो मजुरीचे काम करायचा. त्याचे आमच्या ओळखीतील आचल गजानन मामडीवार हिच्याशी मैत्री होती. ती अधुनमधून आमच्या घरी येत होती. परंतु, आमच्या जातीमुळे तिच्या घरातील लोकांचा विरोधा होता. तरी माझा मुलगा सक्षम व आचल मामीडवार यांची एकमेकांसोबत मैत्री होती त्यांना लग्न करायचे होते. मामीडवार यांनी माझ्या मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. जयश्री मामीडवार ही नेहमी माझा मुलगा सक्षमच्या विरोधात गजानन, साहील, हिमेश यांना भडकावत होती. परंतु माझ्या मुलावर अगोदरच त्यांनी गुन्हा दाखल केल्याने आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही, असे सक्षमच्या आईने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.
आणखी वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.