Nanded News – गोदावरी नदी पात्रात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गोदावरी नदीच्या नगीना घाट येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रणवीर यशवंत शिंगाडे (14) आणि गणेश डोंगरे (13) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

शहरातील साठे चौक परिसरातील तीन लहान मुले नगीना घाट पोहण्यासाठी गेली होती. यापैकी दोन जण पाण्यात बुडाले.​नदीपात्रात मुले बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेतली, मात्र दुर्दैवाने तोपर्यंत उशीर झाला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे शिंगाडे आणि डोंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Comments are closed.