सक्षम ताटेच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी समाज कल्याण विभाग सरसावले, एका सदस्याला शासकीय नोकरी अन्


नांदेड : नांदेडमध्ये घडलेल्या सक्षम ताटे (Saksham Tate) या तरुणाच्या खून प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. २७ नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे (Saksham Tate) याची प्रेयसी आचल मामीडवार कुटूंबियांकडून सक्षम याचा खून करण्यात आला होता. या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता आठवरती गेली आहे. नांदेडमधील इतवारा भागातील संघसेन नगर येथील २० वर्षीय सक्षम ताटे या तरुणाचा सिद्धनाथपुरी भागातील १९ वर्षीय आचल मामीडवार हिच्यासोबत प्रेमसंबंध होते. मागील तीन वर्षापासून ते एकमेकांसोबत होते. या दोघांच्या प्रेम प्रकरणाला मुलीच्या घरच्याचा विरोध होता. याच कारणावरून २७ नोव्हेबर रोजी मिलिंद नगर परिसरात सक्षम  ताटेची प्रेयसीच्या वडीलांनी आणि भावांनी गोळ्या घालून आणि फरशीने डोक्यात घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आचलची आई जयश्री गजानन मामीलवाड, वडील गजानन बालाजी मामीलवाड, भाऊ साहिल गजानन मामीलवाड, सोमेश सुभाष लखे, वेदांश अशोक कुंदेकर उर्फ कुलदेवकर, अमन देव‍िदास शिरसे, आण‍ि मुलीच्या अन्य एका अल्पवयीन भावाला यापूर्वी अटक केली. या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.(Saksham Tate)

समाज कल्याण विभागाकडून पीडित सक्षम ताटेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाकडून एकूण ८ लाख २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. यापैकी ४ लाख १२ हजार ५०० रुपये पहिला हप्ता पीडित कुटुंबियांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला आहे. तर उर्वरित रक्कम न्यायालयात चार्ज सीट दाखल झाल्यानंतर देण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण विभागाकडून देण्यात आली आहे. आर्थिक मदती शिवाय कुटुंबियांच्या एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात येणार आहे.

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने ‘धडक 2’ अवॉर्ड सक्षम ताटेला केला समर्पित

‘धडक २’ या चित्रपटात नीलेशची भूमिका साकारून प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचीही मने जिंकणारा अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) याला अलीकडेच या भूमिकेसाठी पॉवर पॅक्ड परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मात्र हा सन्मान स्वीकारताना त्यानी तो स्वतःपुरता न ठेवता तो नांदेडमध्ये प्रेमप्रकरण आणि जातीय विखारातून बळी ठरलेल्या दिवंगत सक्षम ताटे (Saksham Tate) या मृत तरूणाला समर्पित केला आहे. मंचावरून सिद्धांत (Siddhant Chaturvedi) याने सक्षम ताटेला श्रद्धांजली अर्पण करत अत्यंत संवेदनशील मेसेज दिला आहे. सिद्धांत म्हणाला, “हा पुरस्कार फक्त माझा नाही. जात या आधारावर ज्यांना बहिष्कृत केलं गेलं, दुय्यम वागणूक दिली गेली, भेदभाव सहन करावा लागला, त्यांच्याही जिद्दीचा हा सन्मान आहे. परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी उभं राहण्याचा, लढण्याचा आणि अस्तित्व टिकवण्याचा अधिकार मिळवला. त्यांची ही जिद्द मला सलाम करायला लावते. त्यामुळे हा पुरस्कार मी दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतो, ज्यांच्या मागे त्यांचं कुटुंब, त्यांचा गाव आणि आज माझं मनही उभं आहे.”

आणखी वाचा

Comments are closed.