चंद्रावर सुरू होणार मोबाईल आणि इंटरनेट सेवा, NOKIA सह NASA लॉन्च करणार मिशन

चंद्रावर मानवी वसाहत आणि रस्ते-रेल्वे नेटवर्कच्या तयारीदरम्यान अमेरिकन अंतराळ संस्था नासा मोबाईल आणि इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. यासाठी नासाने नोकिया कंपनीसोबत करार केला आहे. हे मिशन गुरुवारी सुरू होणार आहे. यात अथेना लँडर चंद्रावर लॉन्च केले जाईल. हे एक ऐतिहासिक मिशन असणार आहे, कारण यामुळे चंद्रावर पहिले मोबाईल नेटवर्क स्थापित होणार आहे.
हे मिशन इन्ट्युट्यूव्ह मशीन्सच्या IM-2 मिशनचा एक भाग आहे आणि नोकियासोबतच्या भागीदारीमुळे शक्य झालं आहे. नोकियाने विकसित केलेली Lunar Surface Communication System (LSCS) चंद्राच्या पृष्ठभागावर कनेक्टिव्हिटी स्थापित करण्यासाठी पृथ्वीवर वापरल्या जाणाऱ्या सेल्युलर तंत्रज्ञानाचा वापर करेल.
हे नेटवर्क लँडर आणि वाहनांमध्ये हाय-डेफिनिशन व्हिडीओ स्ट्रीमिंग, कमांड, कंट्रोल कम्युनिकेशन्स आणि टेलिमेट्री डेटा ट्रान्सफर सक्षम करेल. हे नेटवर्क अशा प्रकारे डिझाइन करण्यात आले आहे की, ते कोणत्याही परिस्थितींना तोंड देऊ शकतो.
Comments are closed.