धक्कादायक! आई-वडील कामावर गेले अन् अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीनं जीवनयात्रा संपवली, नाशिकमध्ये


नाशिक गुन्हे: नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिकरोडच्या सामनगाव (Samangaon) येथे एका 10 वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं शहर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाणे (Nashik Road Police Station) येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Nashik Crime News)

नाशिकच्या सामनगाव येथे केवळ 10 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीचे आई-वडील हे मोल मजुरीचे काम करतात. दोघे आई वडील हे रोजगारासाठी मोल मजुरी करण्यासाठी गेले होते. यावेळी राहत्या घरात नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने घराच्या छताला गळफास घेऊन 10 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली.

Nashik Crime: आत्महत्येचे कारण अस्पष्ट

ही बाब तिच्या घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर मयत मुलीच्या वडिलांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. सदर मुलीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्ती केली जात असून, या घटनेबाबत नाशिकरोड पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Nashik Crime: पेठरोडला 43 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

दरम्यान, नाशिकच्या पेठरोड परिसरात देखील आत्महत्येची घटना घडली आहे. उत्तम लाजरस तोरण (वय 43, रा. श्रीराम रो हाऊस, मेघराज बेकरी मागे, पेठरोड) यांनी शुक्रवारी अज्ञात कारणातून राहत्या घरात पंख्यास बेडशिट बांधून गळफास लावून घेतला. ही बाब निदर्शनास येताच त्यांची पत्नी ललिता तोरण यांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सोनवणे करीत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime Bhushan Londhe Arrested: दोन महिने फरार, 34 फुटांवरून मारली उडी, दोन्ही पाय झाले फ्रॅक्चर; कुख्यात गुंड भूषण लोंढे नाशिक पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?

Nashik Crime News: पैशांवरून वाद विकोपाला, पतीकडून बिहार अन् कॅनडातून पत्र पाठवत पत्नीला ‘तिहेरी तलाक’ देण्याचा प्रयत्न; नाशिकमध्ये खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.