धक्कादायक! गावच्या सरपंचानेच केला दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, नाशिक जिल्ह्यात खळबळ
नाशिक गुन्हेगारी बातम्या: नाशिक (Nashik) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. गावच्या सरपंचानेच दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual assault on two minor girls) केल्याची घटना घडली आहे. ही घटना चांदवडच्या विटावे गावात घडली आहे. सरपंचाने मुलींच्या आजीच्या मदतीने या दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून सरपंच साईनाथ कोल्हे, संजय पवार व आजी संगीता आहीरे यांच्या विरोधात अनुसूचित जमाती प्रतिबंधक व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनाही पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे.
दोन अल्पवयीन मुलींवर आरोपीने त्र्यंबकेश्वर, नाशिकशिर्डी, अहिल्यानगर व विटावे इथे शरीरसंबध केल्याचा आरोप आहे. तर संशयित आरोपीसोबत जाण्यास मुलींनी नकार दिल्याने आजीने दोघींना चावा घेत व शिवीगाळ दमदाटी व मारहाण करुन घरात कोंडून ठेवल्याची तक्रार पीडित मुलींनी दिली आहे. मनमाड विभागाचे पोलीस उपअधिक्षक बाजीराव महाजन हे स्वत: या घटनेचा तपास करीत आहेत.
https://www.youtube.com/watch?v=ywhsok1dxxc
महत्वाच्या बातम्या:
Palghar : खाऊचं आमिष दाखवून 60 वर्षांच्या नराधमाचा 8 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
अधिक पाहा..
Comments are closed.