भाजपने नाशिकमध्ये मोठा डाव टाकला, ठाकरेंचे खासदार राजाभाऊ वाजेंचे काकाच गळाला लावले; सिन्नरमध्य
नाशिकचे राजकारण: सिन्नर नगरपरिषद निवडणुकीच्या (Sinnar Nagar Parishad Election) तोंडावर भाजपने (BJP) आपल्या राजकीय बळकटीसाठी महत्त्वाची चाल खेळली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shiv Sena UBT) खासदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांचे काका आणि सिन्नरचे माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे (Hemant Waje) हे आज (शुक्रवार, दि. 14) भाजपात प्रवेश करणार आहेत. नाशिक येथील वसंतस्मृती या भाजप कार्यालयात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
राज्यातील पहिल्या महिला आमदार रुक्मिणीबाई विठ्ठल वाजे यांचे चिरंजीव हेमंत वाजे यांच्या प्रवेशामुळे सिन्नरमधील भाजपाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे मानले जात आहे. हेमंत वाजे आगामी निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार असतील, अशी माहिती मिळत आहे. हेमंत वाजे यांनी यापूर्वी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेता अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांच्या वडिलांनी, स्वर्गीय विठ्ठल वाजे यांनीही सिन्नर नगराध्यक्षपद भूषवले होते.
Shiv Sena UBT: ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे चुलत काका भाजपात येत असल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल (Shirish Kotwal) भाजपात दाखल झाले होते. त्यानंतर आता हेमंत वाजे यांचे प्रवेशामुळे विरोधकांसोबतच भाजपाच्या मित्रपक्षांनाही धक्का बसणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंचे बंधूही भाजपमध्ये दाखल
याआधीच राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे भाजपात दाखल झाले आहेत. ते जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. तर हेमंत वाजे नगरपालिकेच्या मैदानात उतरतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आठ दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या उदय सांगळे यांनी हेमंत वाजे यांच्या प्रवेशासाठी पुढाकार घेतल्याची माहिती मिळत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.