अजित दादांकडे सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव, एकत्र येण्यावर संवाद; NCP शहराध्यक्षांचा दावा


पुणे : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Election) घोषणा करण्यात आली असून 246 नगरपालिका आणि 18 नगरपंचायतींसाठी मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, स्थानिक पातळीवर घडामोडींना वेग आला असून काँग्रेसने मुंबई महापालिका स्वतंत्र लढवण्याचा निर्धार केला आहे. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अजित पवारांच्या (Ajit pawar) राष्ट्रवादी काँग्रेससोबत टायमिंग साधल्याचं दिसून येत आहे. एकीकडे बीड, चंदगड, बार्शीसह अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी (राष्ट्रवादी) एकत्र येत असल्याचं चित्र असतानाचा आता सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे.

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पवार काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार असल्याच्या घडामोडींना वेग आला आहे. टीया दृष्टीने सर्वात महत्वाची अपडेट करा एबीपी माझावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी बोलून दाखवलीय. अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भाऊ-बहिणींचा एकत्र येण्याबाबत संवाद झाला आहे. अजितदादा काका शरद पवार यांच्याशी याबद्दल अंतिम चर्चा करणार आहेत, असा दावा पिंपरी चिंचवडमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी म्हटलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत बहल यांनी अजित दादांशी चर्चा केली, त्यावेळी स्वतः अजित दादांनी ही माहिती दिल्याचहेही बहल यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, दोन राष्ट्रवादी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून एकत्र येत असल्याचं दिसून येत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी एकत्र (NCP alliance election)

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्ता नाटकानंतर अजित पवारांनी पक्षप्रमुख शरद पवार यांच्याविरोधात जाऊन राष्ट्रवादीतील आमदारांचा वेगळ गट निर्माण करत सत्तेत सहभाग घेतला होता. त्यामुळे, राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले. त्यातच, शरद पवारांना नवा पक्ष स्थापन करावा लागला. सध्या, राज्यात दोन राष्ट्रवादी काँग्रेस असून एकाचं नेतृत्व शरद पवार करत आहेत. तर, दुसऱ्या पक्षाचे नेते अजित पवार आहेत. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी एकच असल्याची नेहमीच चर्चा रंगत असते. त्यातच, आता दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड नगरपालिका निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे कॅबिनेटमंत्री हसन मुश्रीफ यांनीच ही मध्यस्थी केली असून केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हा आमचा अजेंडा असल्याचं स्थानिक नेत्यांनी म्हटलं आहे. तसेच, बीडमध्येही दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या असून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद नसली तरीही दोन राष्ट्रवादी एकत्र आल्याचं दिसून येत आहे.

हेही वाचा

जमिनीचाच अधिकार नाही, तर कोणालाच 42 कोटी देत व्यवहार रद्दचा अधिकार नाही; पार्थ पवार, अमेडियावर ताबडतोब एफआयआर झाला पाहिजे; अंजली दमानियांचे कायद्यावर बोट

आणखी वाचा

Comments are closed.