फिजिक्स एक्स्पर्ट अन् ब्युटी पार्लर चालवणाऱ्या दोघींनी नीट पेपरफुटीचा कट कसा रचला? सीबीआयच्या च

पुणे :  देशाला हादरवून सोडणाऱ्या  नीट पेपरफुटी प्रकरणाचा केंद्रबिंदू हा पुणे असल्याचं दिसून आलं आहे. नीट पेपरफुटीप्रकरणात केंद्रबिंदू प्रकरणात सीबीआयने पुण्यातून (NEET Paper Leak Pune Crime) अटक केलेल्या मॉडर्न महाविद्यालयातील शिक्षिका मनीषा मांढरे आणि शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार या केवळ मैत्रिणी नव्हत्या, तर नीट पेपरफुटीतील अत्यंत जवळच्या भागीदार असल्याचंही (NEET Paper Leak Pune Crime) समोर आलं आहे. पेपरफुटी प्रकरणातील दोन मनिषा या एकमेकींना ओळखत असल्याचंही समोर आलं आहे. त्यांच्या अनेकदा भेटीगाठी झाल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे.(NEET Paper Leak Pune Crime)

NEET Paper Leak Pune Crime : दोन्ही मनीषांनी लीक केलेले प्रश्न व प्रत्यक्ष नीटच्या परीक्षेत

मनीषा मांढरे आणि ब्युटीपार्लर चालक मनीषा वाघमारे यांची ओळख पार्लरमध्ये झाली होती. याच ओळखीतून नीट पेपरफुटीचा कट रचला असल्याची शक्यता आहे. मनीषा वाघमारे ही विद्यार्थी व पालकांशी संपर्क साधून इच्छुक विद्यार्थ्यांना पालकांसह मनीषा मांढरे हिच्याकडे पाठवत असे, असल्याचं समोर आलं आहे.(NEET Paper Leak Pune Crime)

तर ‘एनटीए’ने फिजिक्स विषयाची तज्ज्ञ म्हणून पुण्यातील मनीषा हवालदार हिची नियुक्ती केली होती. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या गोपनीय ठिकाणापर्यंत मुख्य प्रश्नांपर्यंत तिचा हात होता. याच अधिकाराचा गैरवापर करत मनीषा हवालदार हिने फिजिक्स विषयाचे प्रश्न मनीषा मांढरे हिच्याशी शेअर केले. त्यामुळे या दोन्ही मनीषांनी लीक केलेले प्रश्न व प्रत्यक्ष नीटच्या परीक्षेत आलेले प्रश्न अगदी हुबेहूब होते, असे सीबीआय तपासात समोर आले आहे.(NEET Paper Leak Pune Crime)

दरम्यान, सीबीआयने पुण्यातील शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा वाघमारे व मनीषा मांढरे यांची कसून चौकशी केली. त्यातून मनीषा हवालदार हिचे नाव पुढे आले आहे. त्यानुसार, सीबीआयने शुक्रवारी पुण्यातील शेठ हिरालाल सराफ प्रशालेत छापेमारी करत मनीषा हवालदार हिला अटक केली. निवृत्तीच्या काही दिवस आधीच मनीषा हवालदार पेपरफुटीप्रकरणात सापडल्याने तिला निलंबत करण्यात आलं आहे.

NEET Paper Leak Pune Crime :  पुरावे नष्ट करण्यासाठी नोट्स जाळल्या अन्…

बायोलॉजी विषयाची प्राध्यापिका मनीषा मांढरे सोबत केलेले चॅटिंग सुद्धा मनीषा हवालदार हिने डिलिट केले होते. त्याचबरोबर मनिषा हवालदार आणि मनिषा मांढरे यांच्यामधील व्हॉट्सॲप मेसेज डिलीट केले. मनिषा हवालदारने पतीच्या फोनवरून सुद्धा काही प्रश्नसंच मनिषा मांढरेला पाठवले असल्याची सूत्रांची माहिती आहे.(NEET Paper Leak Pune Crime)

सीबीआयने केलेल्या चौकशीत मनिषा हवालदारने, नीट परीक्षेशी संबंधित ज्या भौतिकशास्त्राच्या नोट्स त्यांनी स्वतः तयार केल्या होत्या, हवालदारने जाळून टाकल्याची माहिती आहे. तपास यंत्रणांना संशय येऊ नये किंवा त्यांच्या हाती कोणतेही लेखी पुरावे लागू नयेत, या उद्देशाने ते जाळण्याचा प्रयत्न केला.

NEET Paper Leak Pune Crime :  मांढरेसोबत केलेले व्हॉट्सॲप चॅटिंग आणि मेसेज केले डिलीट

हवालदारने फक्त लेखी नोट्सच नाही, तर डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठीही मनिषा हवालदारने सहआरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबत केलेले सर्व व्हॉट्सॲप चॅटिंग आणि मेसेज डिलीट केले. सापडू नये यासाठी मेसेज हटवले असल्याची माहिती आहे, सीबीआय आता हे तांत्रिक पुरावे पुन्हा मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहे.

मनीषा हवालदारनी आपल्या पतीच्या फोनचा देखील वापर केला होता. पतीच्या मोबाईलवरून तिने मनीषा मांढरे हिला प्रश्नमालिका पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पतीच्या फोनवरून पाठवलेले हे मेसेज आता या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत.

शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.