मांढरेसोबत कनेक्शन; पुरावे नष्ट करण्यासाठी लढवली शक्कल, पतीच्या फोनचा वापर अन् चॅटिंगही डिलीट;
पुणे : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येताना दिसत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनिषा हवालदार हिने नीटचे प्रश्न विकले (NEET Paper Leak Pune Crime)असल्याची माहिती समोर आली होती, त्यानंतर, आता सीबीआयच्या तपासात आणखी महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत, तिने पुरावे नष्ट करण्यासाठी पुरेपूर प्लॅनिंग (NEET Paper Leak Pune Crime) केल्याचे समोर आले आहे. सीबीआय (CBI) तपासात उघड झाले आहे. तपासाचा धागा आपल्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी हवालदार यांनी चक्क भौतिकशास्त्राच्या नोट्स जाळून नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे.(NEET Paper Leak Pune Crime)
सीबीआयच्या तपासात नीट (NEET) पेपर फुटी (Paper Leak) प्रकरणी पुण्यातून महत्वाचे अपडेट समोर आले आहेत. पेपरफुटीप्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे. भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या काही नोट्स जाळण्याचा आरोप तिच्यावरती करण्यात आला आहे. ‘फिजिक्स विषयाचे प्रश्नसंच असलेल्या काही ‘नोट्स’ आरोपी मनिषा हवालदार हिने जाळून नष्ट केल्या असल्याचा धक्कादायक खुलासा साबीईयच्या (CBI) तपासातून समोर आला आहे. तपास यंत्रणांना संशय येऊ नये किंवा हाती काही पुरावे लागू नये म्हणून मनीषा हवालदार हिने प्रश्न लिहिलेल्या नोट्स जाळून टाकल्या असल्याचं समोर आलं आहे. (NEET Paper Leak Pune Crime)
बायोलॉजी विषयाची प्राध्यापिका मनीषा मांढरे सोबत केलेले चॅटिंग सुद्धा मनीषा हवालदार हिने डिलिट केले होते. त्याचबरोबर मनिषा हवालदार आणि मनिषा मांढरे यांच्यामधील व्हॉट्सॲप मेसेज डिलीट केले. मनिषा हवालदारने पतीच्या फोनवरून सुद्धा काही प्रश्नसंच मनिषा मांढरेला पाठवले असल्याची सूत्रांची माहिती आहे.(NEET Paper Leak Pune Crime)
NEET Paper Leak Pune Crime : पुरावे नष्ट करण्यासाठी नोट्स जाळल्या अन्…
सीबीआयने केलेल्या चौकशीत मनिषा हवालदारने, नीट परीक्षेशी संबंधित ज्या भौतिकशास्त्राच्या नोट्स त्यांनी स्वतः तयार केल्या होत्या, हवालदारने जाळून टाकल्याची माहिती आहे. तपास यंत्रणांना संशय येऊ नये किंवा त्यांच्या हाती कोणतेही लेखी पुरावे लागू नयेत, या उद्देशाने ते जाळण्याचा प्रयत्न केला.
NEET Paper Leak Pune Crime : मांढरेसोबत केलेले व्हॉट्सॲप चॅटिंग आणि मेसेज केले डिलीट
हवालदारने फक्त लेखी नोट्सच नाही, तर डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठीही मनिषा हवालदारने सहआरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबत केलेले सर्व व्हॉट्सॲप चॅटिंग आणि मेसेज डिलीट केले. सापडू नये यासाठी मेसेज हटवले असल्याची माहिती आहे, सीबीआय आता हे तांत्रिक पुरावे पुन्हा मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहे.
मनीषा हवालदारनी आपल्या पतीच्या फोनचा देखील वापर केला होता. पतीच्या मोबाईलवरून तिने मनीषा मांढरे हिला प्रश्नमालिका पाठवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पतीच्या फोनवरून पाठवलेले हे मेसेज आता या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा ठरणार आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.