न्यूझीलंडची लॉर्ड्स कसोटीत घसरण
इंग्लंडने लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडचा 115 धावांनी धुव्वा उडवत मालिकेला दणक्यात सुरुवात केली. पहिल्या डावात अवघ्या 140 धावांत गारद झाल्यानंतर इंग्लंडने जबरदस्त पुनरागमन केले. ओली रॉबिन्सनच्या भेदक गोलंदाजीने आणि उपयुक्त फलंदाजीने सामना फिरवला. पावसाचा व्यत्यय आणि खेळपट्टीवरील असमान उसळी यांची चर्चा रंगली, पण न्यूझीलंडची फलंदाजी दोन्ही डावांत कोलमडली. या पराभवामुळे ‘ब्लॅक कॅप्स’ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत दुसऱ्यावरून चौथ्या स्थानी घसरले.
Comments are closed.