निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाल
Nilesh Rane: राज्यभर आज (2 डिसेंबर) नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया होत असताना मालवणमध्ये (Malvan Nagarparishad Election) मतदानाच्या आदल्या दिवशी मोठा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका कारमधून तब्बल दीड लाख रुपयांची रोकड जप्त केली असून ही कार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्याची असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकारानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आक्रमक भूमिका घेतली. राणे यांनी भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. तर निलेश राणे यांनी थेट मालवण पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडत कारवाईची मागणी केली. या सर्व घडामोडींमुळे मतदानाच्या आदल्या रात्री मालवणमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. यानंतर निलेश राणे यांनी आज निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीनंतर निलेश राणे यांनी मोठा निर्णय घेतलाय.
निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. निलेश राणे म्हणाले की, मी चार दिवसांपूर्वी पैशांचा प्रकार पकडून दिला. त्याचा अहवाल अजूनपर्यंत माझ्यापर्यंत आलेला नाही. त्यांनी तो पुढे पाठवलेला आहे. ते पब्लिक डॉक्युमेंट आहे, त्यात ते सर्वांना दिसायला हवे. कालच्या विषयात अजून पर्यंत एफआयआर दाखल नाही. मागच्या विषयात देखील एफआयआर दाखल नाही. उलट माझ्यावरच एफआयआर दाखल झालेली आहे.
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार
कालच्या विषयात सकाळी पाच वाजेपर्यंत मी पोलीस स्टेशनमध्ये होतो. त्याच्यावर एफआयआर झालेली नाही. जे सर्व आरोपी पकडले गेले आहेत, ज्यांच्यावर आम्ही आरोप केलेले आहेत ते सर्व मोकाट सुटणार आणि ते सुटलेलेच आहे. ते सर्व बाहेर फिरत आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. मला माहिती होतं हे असेच होणार आहे. पण, आता मी वकिलांशी बोलून या विषयात ज्या ज्या कोणत्या पार्टी आहेत, यात ज्यांचा हातभार असेल अशा सगळ्यांवर मी केस करायचे ठरवले आहे. निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, आता माझ्याकडे पर्याय उरलेला नाही, असे निलेश राणे म्हणाले.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.