कट्टर विरोधक नितेश राणेंची संजय राऊतांसाठी भावूक पोस्ट, मोजक्याच शब्दांत विषय उरकला; म्हणाले…
नितेश राणे संजय राऊत यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अलीकडेच तब्येत बिघडली आहे. त्यांनी पुढील दोन महिने सामाजिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत दिली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीच्या सुधारणेसाठी प्रार्थना केली आहे. आता संजय राऊत यांचे कट्टर विरोधक भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांची याबाबत प्रतिक्रिया समोर आली आहे.
Nitesh Rane on Sanjay Raut: काय म्हणाले नितेश राणे?
संजय राऊत नेहमीच राणे कुटुंबावर टीका करताना दिसतात, तर नितेश राणे यांनी देखील अनेकदा राऊत यांच्यावर तीव्र भाषेत टीका केली आहे. मात्र, राऊत यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच नितेश राणे यांनी तत्काळ काळजी व्यक्त केली. एक्सवर पोस्ट करत त्यांनी लिहिलं, “संजय राऊतजी… काळजी घ्या, लवकर बरे व्हा!” असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत काळजी व्यक्त केलीय.
.@rautsanjay61 होय..
काळजी घ्या
लवकर बरे व्हा!
— Nitesh Rane (@NiteshNRane) 1 नोव्हेंबर 2025
Sanjay Raut: संजय राऊत यांची पोस्ट
राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती — जय महाराष्ट्र! आपण सगळ्यांनी माझ्यावर नेहमीच विश्वास आणि प्रेम दाखवलं. मात्र सध्या माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्याने उपचार सुरू आहेत. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला गर्दीत जाणं आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं टाळावं लागणार आहे. मला खात्री आहे की मी लवकरच पूर्ण बरा होऊन नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या,” असे त्यांनी म्हटले आहे.
Aaditya Thackeray on Sanjay Raut: काय म्हणाले आदित्य ठाकरे?
संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील “लवकर बरे व्हा” अशा शब्दांत शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. तसेच महाविकास आघाडीसह महायुतीतील अनेक नेत्यांनी त्यांच्यासाठी त्वरित प्रकृती सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. तर आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत “काळजी घे संजय काका! प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस. आत्ताही तेच होईल, याची खात्री आहे,” असे म्हटले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.