शनिवारीही उमेदवारी अर्ज स्वीकारणार

नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकांकरिता शनिवार, 15 नोव्हेंबरला सुट्टीच्या दिवशीही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. संकेतस्थळावर फक्त नामनिर्देशनपत्र व शपथपत्रातीलच माहिती भरणे आवश्यक आहे. त्यावर कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
संकेतस्थळावर संपूर्ण माहिती भरलेल्या नामनिर्देशनपत्राची आणि शपथपत्राची प्रिंट घेऊन व त्यावर सही करून आवश्यक कागदपत्रांसह तो संपूर्ण संच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे विहित मुदतीत जमा करावा, असे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

Comments are closed.