पाकिस्तान टीमवर ICC ची कडक कारवाई; श्रीलंका विरुद्ध मालिकेदरम्यान नेमकं काय घडलं? जाणून घ्या प्
इस्लामाबाद बॉम्बस्फोटानंतर पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका वनडे मालिका पुन्हा नियोजित : श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 11 नोव्हेंबर 2025 रोजी सुरुवात झाली. पहिल्या वनडेत पाकिस्तानने दणदणीत विजय मिळवला असला, तरी या सामन्यानंतर त्याच्यावर मोठी कारवाई झाली. सामना जिंकूनही आयसीसीने पाकिस्तान संघावर कठोर कारवाई केली आहे. पहिल्या वनडेत झालेल्या गंभीर चुकांमुळे पाक संघाला मोठा दंड ठोठावण्यात आला. विशेष म्हणजे, कर्णधार शाहीन आफ्रिदीलाही आपली चूक मान्य केली आहे.
पाकिस्तान टीमला ICCची कडक शिक्षा
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत पाकिस्तानचा ओव्हर-रेट ठराविक वेळेपेक्षा खूपच कमी होता. रावलपिंडीतील या सामन्यावर आयसीसीने स्टेटमेंट देत आरोपांची पुष्टी केली. मॅच रेफरी अली नक्वी यांनी पाकिस्तान संघावर दंड जाहीर केला, कारण ते निर्धारित वेळेपेक्षा तब्बल 4 षटके मागे होते.
आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टनुसार, प्रत्येक स्लो ओव्हरसाठी 5% दंड होतो. पाकिस्तान 4 ओव्हर मागे असल्याने त्यांच्या संघाची 20% मॅच फी कापण्यात आली. 46व्या ओव्हरनंतर त्यांना एक अतिरिक्त फील्डर 30-यार्ड सर्कलमध्ये ठेवावा लागला. शाहीन आफ्रिदी याने शिक्षा स्वीकारत कोणतीही सुनावणी न मागता आपली चूक मान्य केली.
पाक–श्रीलंका मालिकेवर संकटाचे सावट
दुसरा वनडे 13 नोव्हेंबरला खेळायचा होता. पण इस्लामाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर काही श्रीलंकन खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली. पीसीबीचे चेअरमन आणि पाकिस्तानचे इंटीरियर मिनिस्टर मोहसिन नक्वी यांनी खेळाडूंशी चर्चा केली. दरम्यान, श्रीलंका क्रिकेट बोर्डाने इशारा दिला की परत जाणारे खेळाडूवर कठोर कारवाई केली जाईल. या सर्व गोंधळानंतर दुसरा आणि तिसरा वनडे एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. मालिकेतील दोन्ही सामने आता सुधारित वेळापत्रकानुसार खेळवले जाणार आहेत आणि ही मालिका पुढे सुरू राहणार आहे.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यातील आगामी टी20 त्रिकोणी मालिकेचा नवा कार्यक्रम जाहीर केला आहे. या मालिकेतील सर्व सामने आता रावळपिंडी येथे खेळवले जाणार आहेत.
मालिकेचे वेळापत्रक (सर्व सामने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर) : (Pakistan T20I Tri-Series Full schedule Update)
18 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे
20 नोव्हेंबर – श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे
22 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
23 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे
25 नोव्हेंबर – श्रीलंका विरुद्ध झिम्बाब्वे
27 नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
29 नोव्हेंबर – अंतिम सामना
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.