Palghar News – नालासोपाऱ्यात बापाचा पाच मुलींवर अत्याचार, एकीचा चार वेळा गर्भपात

नालासोपाऱ्यात बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. नराधम बापाने स्वतःच्या पाच मुलींवर अत्याचार केला आहे. धक्कादायक म्हणजे या नराधमाने एका मुलीचा चारवेळा गर्भपातही केला आहे. या माथेफिरू बापाच्या विरोधात नालासोपारा पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा नराधम फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
56 वर्षीय नराधम बाप हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर हत्या, खंडणी व गोळीबार असे अनेक गुन्हे दाखल आहेत. तो त्याच्या पत्नी व पाच मुलींसोबत कोकणातील गावी राहत असताना त्याने आपल्या पाचही मुलींवर अतिप्रसंग केला. या नराधमाच्या जाचाला कंटाळून त्याच्या पत्नीने मुलींसोबत कोकणातून पळ काढला आणि नालासोपाऱ्यातील नातेवाईकांकडे आश्रय घेतला.
Comments are closed.