पंकज देशमुख हत्या प्रकरणी पत्नीने संशयितांची नावे दिली, भाजप आमदार संजय कुटेंच्या पीएचा सहभाग
बुलढाणा : जळगाव जामोदचे भाजपचे आमदार संजय कुटे यांचा ड्रायव्हर पंकज देशमुख याच्या हत्येप्रकरणी पत्नी सुनीता देशमुखांनी तीन संशयितांची नावे पोलीस अधीक्षकांना दिली. त्यामध्ये आमदार संजय कुटे यांचा स्वीय सहाय्यक निलेश वर्माचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे या हत्या प्रकरणातील संशयितांना मदत करणाऱ्या तीन पोलिसांची यादीही सुनीता देशमुखांनी पोलीस अधीक्षकांना दिली. यावर आता पोलीस अधीक्षक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जळगाव जामोदचे भाजपचे आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय असलेले ड्रायव्हर पंकज देशमुख यांचा 3 मे रोजी संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी या मृतदेहाचं मृतकाच्या नातेवाईकांना विश्वासात न घेता अकोला येथील रुग्णालयात शवविच्छेदन केलं. मात्र पंकज देशमुख यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या पत्नीने केला. पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याची मागणी सुनीता देशमुख यांनी लावून धरली आहे?
तीन संशयितांची नावे दिली
सुनीता देशमुख यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची भेट घेऊन या प्रकरणातील तीन संशयतांची नावे दिली. या प्रकरणात संशयितांना मदत करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावेही त्यांनी अधीक्षकांकडे दिली आहेत. आता पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात हे बघणं महत्त्वाचं असेल.
पंकज देशमुख हत्येचा खटला: पंकज देशमुख हत्या प्रकरणातील संशयितांची नावे
1? निलेश शर्मा (एएमदार संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक)
2. गजानन सरोदे ( आमदार संजय कुटे यांचमहा निकटवर्तीय नातेवाईक)
3. परीक्षित ठाकरे ( कंत्राटदार )
या संपूर्ण प्रकरणात संशयितांना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचीही नावे सुनीता देशमुख यांनी दिली. ती खालीलप्रमाणे,
1? श्रीकांत निचळ ( पोलीस निरीक्षक, जळगाव जामोद)
2. अमोल पंडित ( पोलीस उपनिरीक्षक)
3. सचिन राजपूत (गोपनीय विभाग कर्मचारी)
सुनिता देशमुख यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे आणि जाहीर केलेल्या संशयितांच्या नावामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सीआयडी तपासाची मागणी अजूनही मान्य नाही
मयत पंकज देशमुखांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, “या प्रकरणाचा सीआयडी तपास करावा अशी मागणी आपण सातत्याने करत आहोत. या संबंधित आठ-नऊ निवेदन देऊनही त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. या हत्येला तीन महिने होऊन गेले. पण पोलिसांनी आतापर्यंत काय तपास केला हे जाहीर केलं नाही.”
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.