डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; PSI गोपाल बदने अन् प्रशांत बनकरच्या कोठडीत वाढ
सातारा फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण: फलटणमधील (Phaltan) डॉक्टर महिलेच्या आत्महत्या (Phaltan Doctor Death Case) प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत, तर दुसरीकडे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये याप्रकरणात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या संशयित आरोपींची आज पोलीस कोठडी संपलीहे. परिणामी त्यांना आज फलटण न्यायालयात हजर केले असता, त्यांना आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सोनवण्यात आली आहे. या दोघांना काही वेळातच सातारला हलवण्यात येणार आहे, अशीहे माहिती समोर आली आहे.
CM Fadnavis : ‘महिला IPS अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात SIT स्थापन करा’,पोलीस महासंचालकांना थेट आदेश
फलटण (Phaltan) प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘फलटण प्रकरणी महिला आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी (SIT) गठीत करावी’, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. या प्रकरणामध्ये स्थानिक पोलीस (Police) अधिकाऱ्यांवर आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात ही एसआयटी (SIT) स्थापन होणार असून, या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे. सरकार या प्रकरणी ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालून तपासाच्या सूचना दिल्या आहेत.
Phaltan Doctor Case: डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांशी राहुल गांधींचा फोनवरून संवाद
फलटणच्या डॉक्टर तरुणीचा आत्महत्येनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तरुणीचा कुटुंबीयांची भेट घेतली .यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला .राहुल गांधी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबाकडून जाणून घेतली .या घटनेत आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडित कुटुंबाकडून करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.