पीएम किसानचा 20 वा हप्ता जारी करण्यापूर्वी केंद्र सरकारनं दिला सावधानतेचा इशारा, काय सांगितलं..

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत देशभरातील कोट्यवधी शेतकरी आहेत. पीएम किसान सन्मान निधीच्या 20 व्या हप्त्याचे 2000 रुपये कधी मिळणार याकडे शेतकऱ्याचंं लक्ष लागलं आहे. या दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील खात्यावरुन शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनोळखी लिंक, कॉल आणि मेसेजेस यापासून शेतकऱ्यांनी सावध राहाव, असं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय पीएम किसान सन्मान निधीची अधिकृत वेबसाईट आणि पीएम किसान सन्मान निधीचं एक्स प्लॅटफॉर्मवर योजनेसंबंधातील खऱ्या अपडेटस मिळतील असं सांगण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांना नेमकं काय आवाहन करण्यात आलं?

शेतकरी भाऊ आणि बहि‍णींनी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नावावर सोशल मीडियावर पसरवण्यात येत असलेल्या खोट्या माहितीपासून सावध राहा. फक्त http://pmkisan.gov.in आणि @pmkisanofficial या वरुन मिळणाऱ्या अपडेटस वर विश्वास ठेवा. खोट्या लिंक, कॉल आणि मेसेजपासून दूर राहा, असं आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलं आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या अपडेट अधिकृत सोशल मिडिया प्लॅटफॉर्म @pmkisanofficial वरुन मिळवा असं आवाहन करण्यात आलं आहे.

पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. पीएम किसानच्या 20 व्या हप्त्याचे 2000  रुपये कधी मिळणार याकडे लाभार्थी शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना एका वर्षात 6000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या दोन हप्त्यांमध्ये साधारणपणे चार महिन्यांचं अंतर ठेवलं जातं. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात  24 फेब्रुवारी 2025 रोजी वर्ग करण्यात आले होते. आता शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची  रक्कम 10 कोटी 4 लाख 67 हजार 693 शेतकऱ्यांना देण्यात आली होती. महाराष्ट्रातील 9325774 लाभार्थ्यांना 19 व्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणं महाराष्ट्र सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केलेली आहे. या योजनेनुसार राज्यातील शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. दोन्ही योजनांचे मिळून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एका वर्षात 12 हजार रुपये मिळतात.

PM Kisan : पीएम किसानच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा वाढली, 20 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळणार?

आणखी वाचा

Comments are closed.