Police neglect of Swargate Depot’s letter regarding the safety of passengers?


स्वारगेट बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापकांनी पोलिसांना 22 फेब्रुवारी 2025 रोजी पत्र लिहून बसस्थानकातील सुरक्षेसंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली होती. पण यावर ना पोलिसांनी कारवाई केली, ना विभागाकडून काही ठोस उपाययोजना करण्यात आल्या

(Security of ST Depot) पुणे : स्वारगेट एसटी आगारात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याप्रकरणातील आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तथापि, प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात स्वारगेट आगाराने पोलिसांनी चारच दिवसांपूर्वी पत्र लिहिले होते. त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप आता विरोधकांकडून करण्यात येत आहे. (Police neglect of Swargate Depot’s letter regarding the safety of passengers?)

स्वारगेट एसटी आगारात दत्तात्रय गाडे या तरुणाने गोड बोलून पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले. नंतर फलटणला जाणाऱ्या बसबाबत चुकीची माहिती देत तिला दुसऱ्याच बसमध्ये नेले आणि त्याने अत्याचार केल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली. दत्तात्रय गाडे हा सराईत गुंड असून तो सध्या फरार आहे. त्याच्या मागावर आठ पोलीस पथके असल्याचे स्मार्तना पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा – Swargate Case : स्वारगेट प्रकरणाला एसटीची खासगी सुरक्षा कारणीभूत, कदमांकडून पोलिसांची पाठराखण

यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्वारगेट आगाराचे पत्र सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. खासगी प्रवासी गाड्यांचे एजंट तसेच तृतीयपंथीयांचा आगारात सुळसुळाट झाला असून त्यामुळे प्रवाशांची लुटमार सुरू असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे. खासगी एजंट हे बसस्थानक परिसरामध्ये येऊन, गाडीतून, रांगेतून प्रवासी ओढून नेतात. ही अत्यंत गंभीर आणि चुकीची बाब असून याबाबत या अगोदरही अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. परंतु अद्‌यापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे खेदाने म्हणावे लागते, असे या पत्रात पुणे विभागाच्या वाहतूक नियंत्रकाने म्हटले आहे.

सध्या आगारात तृतीयपंथीयांचीही नाहक वर्दळ आणि दमदाटी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मद्‌यपान करून, अतिशय गलिच्छ आणि घाणेरड्या पेहरावामध्ये हे तृतीयपंथी आहोरात्र आगारामध्ये वावरत असतात. गर्दीतील महिला, वृद्ध, लहान मुले यांना स्पर्श करून जबरदस्तीने पैसे घेतले जात आहेत. ही प्रकार अत्यंत चुकीचा असून ही प्रवाशांची लुटमार आहे. त्यामुळे खासगी एजंट आणि तृतीयपंथींवर कडक कारवाई करून त्यांना आगारात येण्यास रोखावे, अशी मागणी स्वारगेट आगाराने केली आहे.

रोहित पवारांची टीका

स्वारगेट बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापकांनी पोलिसांना 22 फेब्रुवारी 2025 रोजी पत्र लिहून बसस्थानकातील सुरक्षेसंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली होती. पण यावर ना पोलिसांनी कारवाई केली, ना विभागाकडून काही ठोस उपाययोजना करण्यात आल्या. परिणामी एका तरुणीवर अत्याचाराची घटना घडली हे आपल्या व्यवस्थेला शोभणारे आहे का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

पोलिसांनी गुंडांवर काय कारवाई केली? पोलीस अन् स्थानिक गुंडांचे काय हितसंबंध आहेत? नेमक्या कुणाच्या फायद्यासाठी खासगी एजंट्सना बसस्थानकात प्रवेश दिला जातो? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सामान्यांना हवी आहेत. संबंधित घटनेस जबाबदार असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकांना निलंबित केले गेले, पण त्यांच्याशी हितसंबंध जोपासणाऱ्या व्यवस्थेतील दलालांवर काय कारवाई होणार? की जनतेची मेमरी शॉर्ट असते असे म्हणून नेहमीप्रमाणे जबाबदारी झटकत सरकार मोकळे होणार? असा खोचक प्रश्नही त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Ajit Pawar : बारामतीत 50 कोटी खर्चून बसस्थानक, पण स्वारगेटकडे पुण्याचे ‘पालक’ अजितदादांचे दुर्लक्ष?



Source link

Comments are closed.