Harshwardhan Sapkal on Bihar Election : महाविकास आघाडीत कोणतंही भांडणं नाही, सपकाळ स्पष्टच म्हणाले..

पोटनिवडणूक निवडणूक निकाल 2025: बिहार निवडणुकीसोबतच, सहा राज्यांमध्ये आठ विधानसभा जागांसाठी आणि एका केंद्रशासित प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमध्ये पोटनिवडणुका झाल्या. एका केंद्रशासित प्रदेशासह सात राज्यांमधील आठ विधानसभा जागांसाठी झालेल्या या पोटनिवडणुकांचे निकाल देखील आज जाहीर होणार आहेत. 11 नोव्हेंबर रोजी ज्या राज्यांमध्ये मतदान झाले. बिहारच्या शेजारील झारखंड, पंजाब, राजस्थान, ओडिशा, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यांमध्ये प्रत्येकी एक विधानसभा जागा समाविष्ट आहे. जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील दोन विधानसभा जागांसाठी मतदान झाले.  त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

गेल्या काही दिवसांपासून राज्याचे लक्ष वेधून ठेवलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Election Result 2025 ) अखेर शुक्रवारी जाहीर होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या कलानुसार भाजप (BJP) आणि जदयूच्या एनडीए आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपने 243 पैकी 101 जागांवर उमेदवार उभे केले असून, विशेष म्हणजे भाजप आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) यांनी प्रथमच समान संख्येने जागांवर निवडणूक लढवली आहे. 2020 च्या निवडणुकीत भाजप 74 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा तर जेडीयू 43 जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. दोन्ही पक्षांनी मिळून एनडीए सरकारची स्थापना केली होती. तसेच राष्ट्रीय जनता दलने 143 जागा, काँग्रेसने 61 जागा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने 20 जागा आणि विकसनशील इंसान पार्टीने 12 जागा लढवल्या.  सध्याच्या कलांवर नजर टाकल्यास, एनडीए आघाडी 193 जागांवर आघाडीवर असून महागठबंधन 45 जागांवर पुढे आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर घणाघात केलाय.

Comments are closed.