Maharashtra Politics | Fadnavis-Thackeray एकाच Hotel मध्ये, राजकीय चर्चांना उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे काल संध्याकाळी वांद्रे कुर्ला संकुल येथील सोफिटेल हॉटेलमध्ये एकाच वेळी उपस्थित होते. दोन्ही नेते संध्याकाळी सहा ते सात वाजल्यापासून हॉटेलमध्ये होते. या भेटीवर आदित्य ठाकरे यांनी ‘आमच्या भेटीच्या बातम्या ऐकतोय. आता बातम्या बघून एक व्यक्ती गावी जाईल, चाललंय ते चालू द्या,’ असे वक्तव्य केले. विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी एका व्यक्तीचे नाव न घेता त्यांना टोला लगावला असे मानले जात आहे. दोन्ही नेते तीन तास एकाच हॉटेलमध्ये होते. विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाही आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस बोलताना दिसले होते. त्यानंतर लगेचच ही मंडळी एकाच हॉटेलमध्ये एकाच वेळेस आल्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. काही सूत्रांनुसार, दोन्ही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आले होते, आदित्य ठाकरे एका संगीत कार्यक्रमासाठी तर देवेंद्र फडणवीस एका वैयक्तिक कामासाठी आले होते. आदित्य ठाकरे चौथ्या माळ्यावर तर देवेंद्र फडणवीस सातव्या माळ्यावर होते. मात्र, विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी एकाच हॉटेलमध्ये समान वेळेत उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

Comments are closed.