Uddhav Thackeray : असे लोक काळाच्या ओघात येतात आणि जातात, देवेंद्र फडणवीसांवर रोख?

मुलाखतीत ‘ठाकरे ब्रँड’वर बोलताना एका खासदाराने ‘देवा’ म्हणजे देवाभाऊ की प्रत्यक्ष देव असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी म्हटले की, जे कोणी असतील तेही, हे लोक काळाच्या ओघात येतात आणि जातात. ‘ब्रँड’ संपवण्यासाठी दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत अनेक लोक कामाला लागले आहेत. याचे कारण त्यांना आपल्याशिवाय देशात दुसरे कोणतेही नाव नको आहे. स्वतःची तुलना देवाबरोबर करायला लागले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, “हे काळांत त्या काळ्याच्या ओघात येतात, काळ्याच्या ओघात जातात. मंडळीसं पावसाळ्यात गांडू येतात ना का?” आपली जी परंपरा आहे, त्या परंपरेला जर कोणी मानत नसेल, तर ती परंपरा सुद्धा त्यांना मानणार नाही, असेही उद्धव ठाकरेंनी नमूद केले. आज सत्तेवर नसताना, राजकीयदृष्ट्या कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. ‘ठाकरे ब्रँड’ आणि शिवसेना लौकिक अर्थाने आपल्याकडे नाही, चिन्हही आपल्याकडे नाही. ज्यांच्याकडे काही नाही आणि जे पोकळ आहेत, त्यांना ‘ठाकरे ब्रँड’ची मदत लागते आहे. हेच ‘ठाकरे ब्रँड’चे वैशिष्ट्य आहे. कारण स्वतः पोकळ आहेत, त्यांच्याकडून कधीही कोणताही आदर्श कोणत्याच क्षेत्रात उभा केला गेला नाही. जनतेला किंवा राज्याला काहीच दिले नाही. ही ‘ब्रँड’ची चोराचोरी करून स्वतःचे महत्त्व वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Comments are closed.