तरुणाच्या मृतदेहाशी लग्न करणाऱ्या करणाऱ्या आचलच्या धाडसाचं प्रकाश आंबेडकरांकडून कौतुक; म्हणाले


Nanded Murder Love Story: नांदेड शहर गुरुवारी संध्याकाळी प्रेमप्रकरणातून एका मुलीच्या कुटुंबीयांनी एका तरुणाचा खून केल्याच्या घटनेनं हादरलं. सक्षम ताटे या तरुणाला मुलीचे वडील आणि दोन भावाने पाठलाग करुन निर्घृणपणे (Nanded Murder) संपवले. सक्षमवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घालून त्याला संपवण्यात आले होते. सक्षम ताटे  याचे त्याच्या मित्राची बहीण आचल मामीलवाड हिच्याशी प्रेमसंबंध (Love) होते. याची कुणकुण लागल्यानंतर आंचलच्या वडिलांनी सक्षमला आपल्या मुलीपासून दूर राहण्याची ताकीद दिली होती. मात्र, त्यानंतरही या दोघांचे प्रेमप्रकरण सुरु राहिल्याने गुरुवारी संध्याकाळी नांदेड (Nanded news) शहरातील जुना गंज भागात आंचलचे वडील आणि भावाने सक्षमची हत्या केली होती. संध्याकाळी 5 वाजून 20 वाजण्याच्या सुमारास सक्षम ताटे याला मुलीच्या वडिलांना बोलावून घेतले होते. याठिकाणी आल्यानंतर गजानन मामीलवाड, साहिल मामीलवाड आणि अन्य तिघांनी मारहाण करुन त्याची हत्या केली. यावेळी प्रेयसी आंचल मामीलवाड सक्षमच्या अंत्यसंस्कारासाठी त्याच्या घरी गेली होती. तेव्हा तिने सक्षमच्या मृतदेहासमोर लग्नाचे काही विधी केले. तसेच तिने सगळ्यांदेखत कपाळावर सक्षमच्या नावाचे कुंकू लावले. अंत्यविधीपूर्वी तिने हळद आणि कुंकू लावून घेतलं शिवाय कपाळावर कुंकू भरले. यावेळी सक्षमला देखील हळद लावण्यात आली. या घटनेनं सर्वांनी हळहळ व्यक्त केली, तर आंचलच्या याच धाडसाचे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कौतुक केले आहे.

Forand nandd urder Love Stry: सचित्र उदाहरणे काय आहेत?

प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत सोशल मिडीयावरती पोस्ट लिहली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की, “नांदेडमध्ये सक्षम ताटे या बौद्ध तरुणाची प्रेम प्रकरणातून अमानुषपणे हत्या करण्यात आली. मुलीच्या कुटुंबियांचा जातीमुळे ह्या प्रेम प्रकरणाला विरोध होता व म्हणून जातीय द्वेषाने या तरुणाची हत्या करण्यात आली. अत्यंत क्रूरपणे हे सर्व घडवण्यात आले. या प्रकरणी मुलीने घेतलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. सक्षम ताटे या तरुणाच्या हत्येनंतर तरुणीने त्याच्या मृतदेहाशी विवाह करत असल्याची घोषणा केली आणि आरोपी कुटुंबियांना अटक करण्याची मागणी केली. आम्ही तरुणीच्या या धाडसाचे दाद देतो. आम्ही खंबीरपणे पीडित कुटुंबीय आणि तरुणीच्या सोबत उभे आहोत”असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

Nanded Murder Love Story: आंचलच्या वाक्याने सगळेच हेलावले

सक्षम आणि आंचल या दोघांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, सक्षम वेगळ्या जातीचा असल्यामुळे या दोघांचे प्रेमसंबंध आंचलच्या घरच्यांना मान्य नव्हते. सक्षम ताटे जेलमधून सुटून आल्यानंतर माझ्या कुटुंबातील लोक त्याच्या खूनाचा कट रचत होते, असे आंचलने सांगितले. आमच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी आणि भावाने सक्षमला मारले पण ते हरले आणि माझा प्रियकर मरून पण जिंकला. आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही आंचलने केली आहे. पोलिसांनी आंचलचे वडील गजानन मामीलवाड, दोन भाऊ यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  जयश्री मदनसिंह ठाकूर,गजानन बालाजीराव मामीलवाड,साहील ठाकूर,सोमाश लखे, वेदांत अशी आरोपींची नावे आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.