मोठी बातमी! मोहम्मद सिराज आयर्लंड-इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकांमधून बाहेर, त्याच्या जागी 'या' खेळाडूची निवड
भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ अफगाणिस्तान विरुद्धची वनडे मालिकेनंतर युरोप दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या या आगामी टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात एक मोठा बदल झाला आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला या मालिकांमधून वगळण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज (9 जून) याबद्दलची घोषणा केली. तसेच मंडळाने सिराजची जागा कोणता खेळाडू घेईल, याचे नावही जाहीर केले आहे.
बीसीसीआय वैद्यकीय पथक आणि संघ व्यवस्थापन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर, सिराजला त्याच्या कार्यभार व्यवस्थापन कार्यक्रमाचा भाग (वर्कलोड) म्हणून विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय हंगामापूर्वी पुरेशी रिकव्हरी सुनिश्चित करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
वरिष्ठ पुरुष निवड समितीने दोन्ही टी20 मालिकांसाठी प्रसिद्ध कृष्णाची निवड केली आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आणि फ्रॅंचायजी (आयपीएल) यांमध्ये उत्तम कामगिरी करत कृष्णा भारताच्या टी20 संघात परतला आहे. यामुळे त्याला पुन्हा एकदा वेगवान गोलंदाजीच्या आक्रमणात आपली जागा मजबूत करण्याची संधी मिळाली आहे.
या दोन्ही मालिकांमध्ये भारताचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. आयर्लंड दौऱ्यात दोन सामने खेळले जाणार असून त्यातील पहिला सामना 26 जून आणि दुसरा सामना 28 जून रोजी खेळला जाणार आहे. इंग्लंड दौऱ्यातील मालिका 1 जुलैपासून सुरू होणार असून 11 जुलैला खेळला जाणार आहे.
इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्याच्या टी 20 मालिकेसाठी अपडेट केलेली टीम इंडिया –
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, वैभव सूर्यवंशीरवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णहर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव.
Comments are closed.