ठाकरेंच्या अनुयायांनीच मराठी परिवाराला मुंबईतून बाहेर करण्याचं कटकारस्थान केलं : सरनाईक

प्रताप सरनाईक: ठाकरे परिवाराकडे मुंबईची (Mumbai)  25 वर्ष सत्ता होती. राज्यात अडीच वर्ष सत्ता असतानाही त्यांनी काही केलं नसल्याची टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik)  यांनी उधव ठाकरे (उधव ठाककेरी) यांच्यावर केली. मराठी परिवाराला मुंबईतून बाहेर करण्याचे कटकारस्थान त्यांच्याच अनुयायांनी केल्याचे नाईक म्हणाले. मराठीच्या मुद्द्यावरुन प्रताप सरनाईकांनी ठाकरे परिवारावर हल्लाबोल केला. हरित धाराशिव उपक्रमासाठी सरनाईक धाराशिव येथे आले  होते, यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हिंदी लादण्याचा प्रयत्न त्यांनी मराठी जनावर केला. त्यामुळे त्यांची टीका निरर्थक असल्याचे सरनाईक म्हणाले. मी लिहिलेलं पत्र वस्तुस्थितीला धरुन आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री असताना मराठी माणसासाठी काय केलं हेच मी पत्रात लिहिलं आहे. प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदेला लिहिलेल्या पत्रावर आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला सरनाईकांनी प्रत्युत्तर दिले.

उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे कौटुंबिक मुलाखत

उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे कौटुंबिक मुलाखत आहे. सगळं काही ठरवून विचारलं जातं. काय विचारायचं आणि काय उत्तर द्यायचं हे सगळं ठरलेलं असतं त्यामुळे त्यावर न बोललेलं बरं असेही प्रताप सरनाईक म्हणाले. आमचं महायुतीचं सरकार दगड असो धोंडे असो ते जनतेचे काम करत राहणार असल्याचे सरनाईक म्हणाले. उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीत निवडणूक आयोगाला शेंदूर फासलेला धोंडा म्हटल्याबाबत प्रताप सरनाईकांना विचारलं असता त्यांनी या मुलाखतीवर टीका केली.

सामनाला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक घडामोडींवर भाष्य केलं आहे. ‘ठाकरे ब्रॅण्ड’ खतम करण्यासाठी बाहेर काही बॅण्ड वाजत आहेत. त्या बॅण्डवाल्यांचा बॅण्ड महाराष्ट्राची जनता वाजवेल, असे जोरदार भाष्य उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र आणि देशातील अनेक प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली. निवडणूक आयोग म्हणजे ‘धोंड्या’ आहे. त्या धोंड्यास शेंदूर फासला तरी ‘शिवसेना’ हे नाव व धनुष्यबाण चिन्ह दुसऱ्या कोणाला देण्याचा अधिकार या धोंड्याला नाही. उद्धव ठाकरे यांनी परखडपणे सांगितले, ‘‘देशाला अशांत, अस्थिर आणि लोकांना सदैव चिंताग्रस्त ठेवायचे हेच भाजपचे धोरण आहे, पण लोकांना सदासर्वकाळ मूर्ख बनवता येणार नाही. मोदींची 75 वर्षे भरत असल्याचा इशारा सरसंघचालकांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Uddhav Thackeray: निवडणूक आयोग म्हणजे ‘धोंड्या’; शेंदूर फासला तरी…; उद्धव ठाकरेंची ‘सामना’ला स्फोटक मुलाखत, काय काय म्हणाले?

आणखी वाचा

Comments are closed.