प्रतीक्षानगरात सर्वपक्षीय निदर्शने, सह्यांची मोहीम, राखीव भूखंड मुंबई बँकेला

प्रतीक्षानगर येथे भाजी मंडई, मच्छी मार्पेट, शासकीय दवाखाना अशा सुविधांसाठी राखीव असलेला भूखंड मुंबई बँकेला देण्यात आल्याच्या निषेधार्थ आज या भूखंडावर राखीव भूखंड बचाव कृती समितीच्यावतीने काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. यावेळी सह्यांची मोहीमही घेण्यात आली. त्यात मोठया संख्येने स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकारी, भाजी विव्रेते अन्य व्यावसायिक व नागरीक सहभागी झाले.

शीव प्रतीक्षा नगर येथील राखीव भूखंडाबाबत 2013 मध्ये स्थानिक नगरसेविका प्रणिता वाघधरे यांनी प्रभाग समिती अध्यक्ष असताना पाठपुरावा केला होता. या भूखंडांवर स्थानिक नागरिकांसाठी सर्व सोयी एकाच ठिकाणी मिळाव्यात असा प्रयत्न होता. त्यात भाजी मार्पेट, मच्छी मार्पेट, पोलीस स्टेशन, महापालिका कार्यालय, म्हाडा कार्यालय, शासकीय दवाखाना अशा सूचनांचा समावेश होता. त्यानुसार हा भूखंड राखीव करण्यात आला. आठ महिन्यांपूर्वी अचानक हा भूखंड मुंबई बँकेला अगदी कवडीमोल किमतीत देण्यात आल्याचा आरोप राखीव भूखंड बचाव कृती समितीचा आरोप आहे.

हा भूखंड वाचवण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, भाजी विव्रेते, इतर व्यावसायिक, नागरिक यांनी काळ्या फित लावून आज निदर्शने केली आणि सह्यांच्या माध्यमातून विरोध दर्शविला. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी पद्मावती शिंदे, गोपाळ शेलार, प्रणिता वाघधरे, संजय भोगले, प्रभाकर भोगले, प्रीतम निंबाळकर, संगीता झेमसे, लवू नर, गणेश शिंदे, शंकर कविलकर, विशाल आमकर, राजू आंबेरकर, प्रशांत शेटये, संजय जगताप, सोमनाथ पवळे, संदीप शिंदे उपस्थित होते.

जन आंदोलन उभारणार

आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत कृती समिती राज्य सरकार, म्हाडा यांच्याकडे पाठपुरावा करीत राहणार, वेळ प्रसंगी स्थानिक व्यावसायिक व नागरिकांना घेऊन मोठे जन आंदोलन उभारणार, असे कृती समितीच्या वतीने गोपाळ शेलार यांनी यावेळी सांगितले.

Comments are closed.