आम्हीच इथले भाई, पुण्यात पुन्हा कोयता घेऊन तरुणांचा हैदोस, 10 ते 12 वाहनांची तोडफोड , व्हिडीओ व
गुन्हे ठेवा: पुण्यात वारंवार कोयता गँगची दहशत चर्चेत असताना पुन्हा एकदा किरकोळ कारणावरून कोयते उपसत तरुणांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे. आम्हीच इथले भाई म्हणत तरुणांच्या जमावाने 10-12 गाड्या फोडल्याचा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडालीय.
नेमकं घडलं काय?
पुण्यातील भवानी पेठ परिसरात पुन्हा एकदा कोयत्याने दहशत माजवणाऱ्या टोळक्याने शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या काही तरुणांनी हातात कोयते आणि तलवारी घेत परिसरात हिंसाचार घडवून आणला. या तरुणांनी थेट रस्त्यावर उतरून जवळपास 10 ते 12 दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली. घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हे तरुण “आम्हीच इथले भाई, आमच्या नादी कोणी लागू नये” असा इशारा देत माजवलेल्या दहशतीमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला होता. मात्र, हा वाद काही तासांतच हिंसक वळणावर गेला. मध्यरात्रीच्या सुमारास या तरुणांनी जमाव करून हातात धारदार शस्त्र घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर जोरदार हल्ला चढवत तोडफोड केली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकारामुळे भवानी पेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
औंध भागात काही दिवसांपूर्वी काेयत्याचा उपद्रव
काही दिवसांपूर्वी औंध भागातही कोयत्याचा धाक दाखवत उपद्रव करणाऱ्या टोळीविरोधात चतु:शृंगी पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. सात जणांच्या टोळीने 28 जून रोजी रात्री 12.15 वाजता काही तरुणांवर कोयत्याने आणि काठ्यांनी हल्ला केला होता. या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना अटक करून त्यांची धिंड काढली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध परिसरात झालेल्या हल्ल्याचा उगम पूर्ववैमनस्यातून झाला होता. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तातडीने कारवाई करत पोलिसांनी सर्व सात आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि तीन लोखंडी कोयते जप्त करण्यात आले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.