निलेश घायवळ गँगचा सक्रीय सदस्य अटकेत, घरी सापडली तब्बल 400 काडतूस, तपासात धक्कादायक माहिती समोर
गुन्हे बातम्या ठेवा: निलेश घायवळ गँग संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. निलेश घायवळ टोळीचा सक्रीय सदस्य असलेल्या अजय सरोदे याच्या घरी तब्बल 400 काडतूस सापडली आहेत. 200 जिवंत काडतूस आहेत तर 200 रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत. अजय सरोदे आणि बटर्या चौधरी या दोघांना कोथरूड पोलिसांनी गाणगापूर, कर्नाटक येथून तीन दिवसांपूर्वी अटक केली आहे.
17 सप्टेंबरला कोथरुड भागात घायवळ टोळीचा एकावर गोळीबार, अजय सरोदे घटनास्थळी उपस्थित
अजय सरोदे यांच्या चौकशीत माहिती समोर आल्यानंतर त्याच्या घराची झडती पोलिसांनी घेतली आहे. 17 सप्टेंबरला कोथरूड भागात घायवळ टोळीने एकावर गोळीबार केला होता त्यावेळी अजय सरोदे घटनास्थळी उपस्थित होता. त्यामुळं त्या गुन्ह्यात अजय सरोदे हा ही आरोपी होता. अजय सरोदे याच्याकडे पिस्तुल परवाना असल्याचं समोर आले आहे. त्याला 29 जानेवारी 2024 ला पोलिसांनी पिस्तुली परवाना दिल्याची माहिती समोर आली आहे.
निलेश घायवळनं दहशत निर्माण करून बेकायदेशीररीत्या जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार केले
पोलीस तपासानुसार, निलेश घायवळनं दहशत निर्माण करून बेकायदेशीररीत्या जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार केले असून, या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केली आहे. तसेच खंडणी उकळणं आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या सर्व घडामोडींचा सखोल तपास होऊन गैरव्यवहार उघडकीस यावेत, यासाठी पुणे पोलिसांनी ईडीला पत्र पाठवलं आहे. यासोबतच निलेश घायवळ याच्यावर 45 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात पुणे पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
गुंड निलेश घायवळ टोळीवर आतापर्यंत तीन मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गुंड निलेश घायवळ टोळीवर आतापर्यंत तीन मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरूड परिसरातील गोळीबाराची घटना, कोयत्यानं हल्ला करण्याची घटना, तसेच कंपनीकडून झालेली मोठ्या प्रमाणातील आर्थिक देवाणघेवाण अशा विविध प्रकरणांमध्ये ही मोक्का कारवाई करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांचा तपास सध्या पोलिसांकडून वेगानं सुरू आहे. आणखी काही महत्त्वाचे तपशील लवकरच समोर येतील, अशी माहिती देखील मिळत आहे. निलेश घायवळ टोळीनं कमी किमतीत जमिनीचे व्यवहार तसेच मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार केल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. या सर्व घडामोडींनंतर विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nilesh Ghaywal: निलेश घायवळचा पाय आणखी खोलात, पुणे पोलिसांचे थेट ईडीला पत्र; पुणे, जामखेडमधील बेनामी संपत्तीवर टाच?
आणखी वाचा
Comments are closed.