आधी कारमध्ये गोळ्या घातल्या, नंतर मृतदेह खाली फेकत अंगावर गाडी घातली; नितीन गिलबिले प्रकरणात क


पिंपरी चिंचवड: चऱ्होलीतील वडमुखवाडी येथील खडी मशीन रस्त्यावर एका व्यावसायिकाला कारमध्ये बसवून त्याच्यावर त्याच्या मित्रांनीच गोळ्या झाडून त्याचा खून (Pune Crime News) केल्याची घटना समोर आली होती. ही घटना बुधवारी (दि. १२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणातील संशयित पळून गेले होते, त्यांच्या शोधात (Pune Crime News) पिंपरी-चिंचवड पोलिसांची पाच पथके त्यांचा शोध घेत होती, त्यातील एका आरोपीला पकडण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे, नितीन गिलबिलेंच्या हत्ये प्रकरणी आरोपी मित्र विक्रांत ठाकूरला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी लोणावळ्यातील अँबीव्हॅली इथून ताब्यात घेतलं आहे. विक्रांतकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत. तर दुसरा आरोपी अमित पठारे मात्र अद्याप ही फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी नितीन गिलबिलेंची गोळ्या झाडून हत्या केली होती.(Pune Crime News)

Pune Crime News: निर्घृण हत्येचं थरारक सीसीटीव्ही (CCTV) फुटेज समोर

या घटनेतील टॉयोटा फॉर्च्युनर कारमध्ये झालेल्या निर्घृण हत्येचं थरारक सीसीटीव्ही (CCTV) फुटेज समोर आलं आहे. बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेतील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे, तर एक आरोपी अजूनही फरार  (Pune Crime News) असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. फुटेजमध्ये हत्या आणि त्यानंतरची अमानुष वागणूक स्पष्ट दिसते. ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अलंकारपुरम ९० फूट रोडवरील श्री साई रोड कॅरिअर, चारोळी परिसरात घडली. मित्रांच्या गटामधील वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. (Pune Crime News)

नितीन शंकर गिलबिले (३८, रा. वडमुखवाडी, चहोली) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी नितीन यांचे भाऊ सचिन शंकर गिलबिले (४०) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमित जीवन पठारे (रा. पठारे मळा, चन्होली), विक्रांत सुरेश ठाकूर (रा. सोलू, ता. खेड) यांच्या विरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune Crime News: नेमकं काय घडलं?

नितीन गिलबिले बुधवारी संध्याकाळी आपल्या दोन मित्रांसह MH 14 LL 8900 नंबरच्या फॉर्च्युनर कारमध्ये चहोलीतील आला होता. कारमध्ये बसलेले असताना तिघांमध्ये वैयक्तिक कारणावरून वाद झाला. या दरम्यान नितीन कारबाहेर उतरला. काही वेळ बोलून तो पुन्हा पुढच्या सीटवर बसला. तेव्हाच आरोपींपैकी एकाने अचानक नितीनच्या डोक्यात गोळी झाडली. नितीनचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह कारमधून बाहेर फेकण्यात आला. त्याचे पाय दरवाज्यात अडकले होते; ते ओढून काढल्यानंतर आरोपी कार घेऊन तिथून पसार झाले आणि ते जात असताना कार गिलबिलेंच्या पायावरून चढवून गेल्याची नोंद सीसीटीव्हीमध्ये आहे.घटनेची माहिती मिळताच दिघी पोलीस आणि क्राइम ब्रँचची पथके घटनास्थळी दाखल झाली. आरोपींच्या शोधासाठी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू आहे.

दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले, “बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पाच पथके कार्यरत आहेत. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. गुन्ह्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.”

आणखी वाचा

Comments are closed.