दिर-वहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना; अंघोळ करताना व्हिडिओ शूट करत होता, तितक्यात….

पुणे: पुण्यात दिर वहिनीच्या नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील खेड तालुक्यात दिर-वहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चुलत-चुलत वहिनी अंघोळ करत असताना, दिर व्हिडीओ शूटिंग करायला आला. मात्र, वहिनीच्या लक्षात ही बाब आल्यानं दिराची विकृती समाजासमोर आली. शेल पिंपळगावात आज सकाळी ही घटना घडली आहे. या प्रकरणी चाकण पोलिसांनी नराधम चुलत दिराला ताब्यात घेतलेलं आहे. विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरु आहे.

पुण्यात स्वारगेट परिसरामध्ये बसमध्ये अत्याचार

स्वारगेट बस स्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात घडलेल्या या प्रकरणाने पुणे हादरलं आहे. नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. चेन स्नॅचींग सारखे गुन्हे त्याच्यावरती आहेत. पोलिसांकडून या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे.

अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये – चाकणकर

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणानंतर महिलांना अनोळखी व्यक्तींशी बोलू नका, त्यांच्या बोलण्याला बळी पडू नका असं आवाहन त्यांनी केला आहे. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर काल सकाळी एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार झाल्याची घटना घडली आहे, या अनुषंगाने मी स्वतः पोलीस आयुक्त तसेच तपास अधिकारी या सगळ्यांशी बोलले आहे. सीसीटीव्ही फुटेजही मी स्वतः पाहिले आहे. ही तरुणी आरोपी सोबत काही वेळ बोलत होती आणि त्याने तिची दिशाभूल करून, तिला खोटं सांगून बसमध्ये नेलं आणि अत्याचार केला.

ती मुलगी काही वेळ त्याच्याशी बोलताना सीसीटीव्हीत दिसत आहे, तर अनोळखी व्यक्तींशी बोलताना काळजी घेणे खूप गरजेचे आहे. शासकीय यंत्रणा, चौकशी कक्ष हे मदतीला असतातच तर त्यांच्याशी संवाद साधायला हवा होता. मात्र, दुर्दैवाने या मुलीने अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि पुढे हा गंभीर आणि वेदनादायी प्रसंग घडला. पोलिसांनी आठ तपास पथक तयार केली आहेत, आठ तपास पथक या सगळ्याचा कालपासून तपास करत आहेत. आरोपीला लवकरच अटक होईल. मात्र, माझं आवाहन आहे की, तरुण मुलींनी, महिलांनी सार्वजनिक जीवनात वावरताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. यंत्रणांची मदत घ्यावी, स्वतःची काळजी घ्यावी. माणसांच्या कळपात हिंस्त्र श्वापदे वावरतात, त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, आपण सतर्क रहावे. आता या प्रकरणात या पीडित मुलीच समुपदेशन व तसेच जलद तपासासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

अधिक पाहा..

Comments are closed.