नातेवाईक असलेल्या तरूणीशी प्रेमसंबंध; प्रियकराच्या खुनाची दिली सुपारी, रस्त्यात अडवून मानेवर गो
पिंपरी : पिंपरीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून (Pune Crime News) सुपारी देऊन नातेवाईक असलेल्या तरुणीच्या प्रियकराला गोळ्या घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात विकास बाळासाहेब केदारी (३१, रा. ताजे, मळवली, ता. मावळ) हा जखमी झाला असून, त्याच्यावरती रूग्णायात उपचार सुरू(Pune Crime News) आहेत. ‘सैराट’ चित्रपटाप्रमाणेच (Pune Crime News) घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे, त्यांना चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. अभिजित संतोष केदारी (वय २६), नितीन ज्ञानदेव केदारी (४२, दोघेही रा. ताजे, ता. मावळ) आणि आकाश अण्णा भोकसे (२६, रा. कुरकुंडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विकास यांचा भाऊ किरण यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune Crime News)
Pune Crime News: अभिजित याच्या नातेवाईक असलेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध
मिळालेल्या माहितीनुसार, विकासचे संशयित अभिजित याच्या नातेवाईक असलेल्या तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. याचा राग असल्याने अभिजितने नितीन केदारी आणि आकाश भोकसे यांना विकासला मारण्याची सुपारी दिली. मावळ तालुक्यातील पुणे–मुंबई द्रुतगती मार्गालगत ओझर्डे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी (दि. ११ नोव्हेंबर) रात्री साडदेहाच्या सुमारास नितीन आणि आकाशने विकासला रस्त्यात अडवलं आणि नितीनने त्याच्या मानेवर पिस्तुलातून (Pune Crime News) गोळी झाडली. ती आरपार गेल्याने विकास रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेनंतर संशयित पळून गेले. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी विकासला रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विकासच्या भावाने फिर्यादीत अभिजित केदारीवर संशय व्यक्त केला होता. (Pune Crime News)
घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस तातडीने धाव घेतली, चौकशी करून पोलिसांनी संशयितांची माहिती मिळाल्यानंतर तिघांना ताब्यात घेतले. अभिजितला रायगड जिल्ह्यातील माथेरान येथून, तर नितीन केदारी आणि आकाश भोकसेला सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील मांढरदेवी येथून ताब्यात घेण्यात आलं.
Pune Crime News: नितीन आणि आकाश हे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार
नितीन आणि आकाश यांच्यावर यापूर्वी खून आणि शस्त्रप्रकरणी गंभीर गुन्हे नोंद आहेत. नितीनवर कामशेत पोलिस ठाण्यात, तर आकाश याच्यावरती चाकण तिहेरी खून प्रकरणात आणि ओशिवरा पोलिस ठाण्यात शस्त्रप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.