पुण्यात पुन्हा रक्तरंजित थरार, रात्री चाकूने सपासप वार करून तरुणाची निर्घृण हत्या, मित्रावरही क
पुणे: पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या (Pune Crime News) घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आहे, अशातच पुणे शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेनं हादरलं आहे. पुणे शहराच्या चंदननगर परिसरात शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून खून (Pune Crime News) करण्यात आला आहे. यावेळी संबंधित तरुणाच्या मित्रावर (Pune Crime News) देखील वार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्राणघातक हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर या हल्ल्यात इतर दोन जणं सुद्धा जखमी (Pune Crime News) झाल्याची माहिती आहे. जखमी तरुणांवर उपचार सुरू आहेत. पूर्ववैमानस्य आणि स्थानिक वादावादीतून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.(Pune Crime News)
Pune Crime News: रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लखनचा काही वेळातच मृत्यू
या घटनेबाबत चंदननगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर येथील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क येथील गार्डनमध्ये शनिवारी रात्रीच्या वेळी काही तरुण एकत्रित जमले होते. याच दरम्यान, अज्ञात आरोपींनी १८ वर्षीय सोनू ऊर्फ लखन सकट वाघमारे (रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) या तरुणावर धारदार चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लखनचा काही वेळातच मृत्यू झाला. या हल्ल्यात अन्य तरुणही जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(Pune Crime News)
Pune Crime News: रात्री आठ वाजता झालेल्या या हत्येच्या प्रकरणाने शहरात पुन्हा एकदा खळबळ
प्राथमिक तपासात ही घटना जुन्या वादातून आणि परिसरातील वर्चस्व वादातून घडली असावी, असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे. रात्री आठ वाजता झालेल्या या हत्येच्या प्रकरणाने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण माहिती घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
Pune Crime News: परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे
पोलिसांनी या घटनेप्रकरणी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या पथकांना रवाना केले आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे चंदननगर पोलीस अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.