घरी आई-वडील, भाऊ अन् बायको-पोरं, आधी चारचाकीच लिफ्ट देऊन महिलांची लूट करायचा, निवडणुकही लढवली;
पुणे : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट एसटी बस स्टँडवरती शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी घडली होती. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा आहे. आरोपी दत्ता गाडेवरती विविध पोलिस स्थानकामध्ये एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा शिरुर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आधी तो पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करत असल्याची माहिती आहे. तो प्रवासी वाहतुकीवेळी वृद्ध महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चारचाकी गाडीत बसवायचा आणि त्यांना निर्जन स्थळी घेऊन जाऊन लुबाडायचा. मात्र, एका महिलेच्या सतर्कतेमुळे त्याला पोलिसांनी पकडल्याची माहिती आहे. त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
दत्ता गाडे काही कामधंदा करत नव्हता…
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नराधम आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा ( वय वर्षे 36, रा. शिरुर) शिरुर तालुक्यातील गुणाट या गावचा रहिवासी आहे. घरातील परिस्थिती बेताची आहे. गावामध्ये त्याचं पक्क्या बांधकामातील पत्र्याचं घर आहे. त्याची वडिलोपार्जित तीन एकर शेतजमीन देखील आहे. आई-वडील शेती काम करतात. तर दत्तात्रय रामदास गाडेला एक भाऊ आहे, पत्नी, लहान मुले देखील आहेत. असं सगळं असून देखील दत्ता गाडे काही कामधंदा करत नसे. तो कायम उनाडक्या करत फिरत असायचा. त्याला झटपट पैसे कमावायचा नाद लागला. त्या नादात त्याने चोरी, लुटमार करण्यास सुरुवात केली. महिलांना, वृध्दांना लुबाडायला सुरुवात केली, अशी माहिती परिसरातील स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे.
पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवाशी वाहतूक करताना लूटमार
पोलिसांनी दत्ता गाडेबाबत माहिती देताना सांगितले की, दत्तात्रय गाडे याने 2019 मध्ये कर्ज काढून एक चारचाकी कार विकत घेतली होती. त्या कारमधून तो पुणे ते अहिल्यानगर अशी प्रवासी वाहतूक करत असे. या दरम्यान त्याने चोरी करायला सुरूवात केली होती. ज्या महिलेच्या अंगावर जास्त दागिने असतील अशा महिलांना तो लिफ्ट द्यायचा त्यानंतर तो त्यांना निर्जन स्थळी नेऊन त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील दागिने लुटत होता.
तंटामुक्ती निवडणुकीसाठी देखील उभा राहिला पण…
दत्तात्रय गाडे हा गुणाट गावाच्या तंटामुक्ती निवडणुकीसाठी उभा राहिला होता. पण, त्याचा त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला. याशिवाय निवडणुकीच्या काळात त्याने एका राजकीय नेत्यासाठी निवडणुकीचं काम देखील केलं असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या सोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.
कुठे-कुठे गुन्हे दाखल
दत्ता गाडेने 2020 मध्ये शिरूर गावाजवळच्या करे घाटात लूटमार केली होती. त्यानंतर त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा देखील दाखल झाला होता. त्याला शिक्षा देखील झाली होती. शिक्रापूर येथे दोन, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा, केडगाव व कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. तसेच इतर गुन्ह्यांतील खटले प्रलंबित असल्याने तो मोकाट होता.
स्वारगेट बसस्थानकामध्ये तरूणीसोबत केलं दुष्कृत्य
पिडीत तरुणीला दत्रात्रय गाडेने जीवे मारण्याची धमकी दिल्याने ही तरुणी घाबरुन गेली. त्यामुळे स्वारगेट बस स्थानकावर आरडाओरड करण्याचे त्राणही तीच्यात उरलं नाही. 26 वर्षांची तरुणी मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकात आली. तीला फलटणला जायचे होते. त्यावेळी स्वारगेट परिसरात सराईत गुन्हेगार असलेला दत्तात्रय गाडे सावज हेरण्याचा प्रयत्न करत होता. 26 वर्षांची ही मुलगी एकटी आहे हे पाहून गाडेने तीला आगारात मधोमध उभी असलेली एस टी फलटणला जाणार आहे असं सांगितलं. सोलापुरहून स्वारगेटला उभी असलेली ही बस पुन्हा सोलापुरला जाणार असून वाटेत ती फलटणला थांबेल असं त्याने पिडीतेला सांगितलं. हे सगळं सांगताना तो पिडीतेला ताई – ताई असे म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेऊन ही तरुणी बसमधे चढली. तीच्या पाठोपाठ दत्तात्रय गाडे देखील बसमधे चढला आणि त्याने तीच्यावर बलात्कार केला. त्यानंतर याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने या तरुणीला दिली. त्यामूळे घाबरुन जाऊन ही तरुणी तीच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगु शकली नाही. त्यानंतर ती दुसऱ्या बसने फलटणला जायला निघाली. वाटेत असताना तीने हा प्रकार तीच्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर पोलीसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.
अधिक पाहा..
Comments are closed.