Pune News – तळेगाव एमआयडीसीत शॅफ्लर इंडिया कंपनीत गॅस गळती; दोघांचा मृत्यू, 3 जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुण्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसीत शॅफ्लर इंडिया कंपनीत मंगळवारी गॅस गळती झाली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. गणेश उंबरे आणि वैभव थोरात अशी मयतांची तर श्रीकृष्ण साहू, गौरीशंकर शर्मा आणि नरसिंह पाटील अशी जखमींची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सुरक्षा यंत्रणा, अग्नीशमन दल आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ संबंधित परिसर रिकामा करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. गॅस गळतीचे कारण अद्याप समजू शकले नाही. प्रशासनाकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

Comments are closed.