6 महिन्यापूर्वीच लव्ह मॅरेज, पत्नी अन् सासरच्यांकडून सततचा मानसिक त्रास; 28 वर्षीय व्यापाऱ्याने


रायगड क्राईम न्यूज: रायगडच्या (Raigad) श्रीवर्धन (Shrivardhan) येथील व्यापारी नरेश सखाराम चौधरी (वय 28) यांनी अवघ्या सहा महिन्यांच्या प्रेम विवाहानंतर संसारातील सततच्या मानसिक ताणाला कंटाळून वडोद्यातील रेल्वे ट्रॅकवर ट्रेनखाली उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Raigad Crime News)

याबाबत अधिक माहिती अशी की, नरेश सखाराम चौधरी हे व्यापारी रायगडमधील श्रीवर्धन येथे राहत होते. सहा महिन्यापूर्वी त्यांच्या लक्ष्मी चौधरी हिच्या सोबत प्रेम विवाह झाला होता. संसार सुखाचा नांदावा ही नरेश यांची इच्छा असताना त्यांच्या पत्नीने व सासरच्या माणसांनी त्याला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ बनवत केला.

Raigad Crime News: वडोदा स्टेशनला उतरले अन्…

3 डिसेंबर रोजी नरेश यांचे मेहुणे श्रीवर्धन येथे तिच्या बहिणीला भेटायला आले. यानंतर नरेश आणि त्याची बायको लक्ष्मी यांना सासू आजारी आहे, तुम्ही दोघेही वडोदाला चला. या बहाण्याने घेऊन गेले. मात्र, तिथे पोहोचल्यावर वेगळंच घडलं. 4 डिसेंबरला सकाळी 4 वाजता जेव्हा नरेश, त्यांची पत्नी आणि मेहुणे वडोदा स्टेशनला उतरले, तेव्हा त्यांच्या मेहुण्याने त्यांना घरी घेऊन जाण्यास नकार दिला.

RAGAD Crime News: उडी आणि praspot prasps सह रेल्वे

यानंतर एका जवळच्या हॉटेलच्या रूममध्ये त्यांना डांबून ठेवले. यानंतर चिडलेल्या नरेश यांनी सासरच्या जाचाला कंटाळून वडोदा येथील फलाट नंबर 7 च्या ट्रॅकवर ट्रेन खाली आत्महत्या केली. यामध्ये नरेश यांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या सहा महिन्यातच नरेश यांचा संसार उध्वस्त झाला. या प्रकरणात वडोदा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

Nashik Crime News: नाशिकमध्ये 10 वर्षीय मुलीची आत्महत्या

नाशिकच्या सामनगाव येथे एका 10 वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुलीचे आई-वडील हे मोल मजुरीचे काम करतात. आई-वडील हे रोजगारासाठी मोल मजुरी करण्यासाठी गेले होते. यावेळी राहत्या घरात नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने घराच्या छताला गळफास घेऊन मुलीने आत्महत्या केली. ही बाब तिच्या घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर मयत मुलीच्या वडिलांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. सदर मुलीने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Thane Crime News: ठाण्यात कारमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार; आरोपी युट्युब पत्रकार, एक ताब्यात, दुसरा फरार

आणखी वाचा

Comments are closed.