राज ठाकरेंच्या सभेला दक्षिण अन् उत्तर भारतीय पोहचले; भाषण संपताच काय म्हणाले?, VIDEO

राज ठाकरे: मीरा रोडमधील सभेत हिंदीच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी थेट आव्हान दिलं आहे. हिंदीसक्ती लागू करून दाखवाच…दुकानंच नाही तर शाळाही बंद करणार, असं राज ठाकरे म्हणाले. तर, भाजप खासदार निशिकांत दुबेंचाही (Nishikant Dubey) राज ठाकरेंनी समाचार घेतला. मुंबईत ये, समुद्रात डुबे डुबे के मारेंगे, असं म्हणत राज ठाकरेंनी दुबेंना प्रतिआव्हान दिलं. यासह मराठी येत नसेस तर कानाखाली बसणारच, असं म्हणत राज ठाकरेंनी मराठीद्वेष्ट्यांनाही थेट इशारा दिला आहे.

मीरा रोडमध्ये काल (18 जुलै) राज ठाकरेंनी आक्रमक भाषण केलं. हिंदी ही कुणाचीही मातृभाषा नाही. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमधील अनेक मातृभाषांसह 250 भाषा हिंदीने मारल्या. अगदी हनुमान चालिसासुद्धा अवधी भाषेत आहे, हिंदी नव्हे. तिथल्या लोकांना उलट ही गोष्ट सगळ्यात आधी समजायला हवी, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे, असंही राज ठाकरेंनी ठणकावले. दरम्यान, राज ठाकरेंच्या या विधानावर गुजराती, उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीयांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना दक्षिण-उत्तर भारतीय नेमकं काय म्हणाले, पाहा…

दक्षिण अन् उत्तर भारतीय काय म्हणाले?

महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलीच पाहिजे, असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. राज ठाकरेंच्या या सभेला गुजराती पदाधिकाऱ्यांपासून ते दक्षिण भारतीय उत्तर भारतीय देखील उपस्थित होते. माझी जन्मभूमी-कर्मभूमी महाराष्ट्रात आहे, त्यामुळे मराठी शिकलीच पाहिजे, असं एक गुजराती पदाधिकारी म्हणाला. तसेच जो कोणी मराठीविरुद्ध बोलेल, त्याला आम्ही कानाखाली मारणारचं, असा इशारा देखील या गुजराती पदाधिकाऱ्याने दिला. तसेच उत्तर भारतीय असलेल्या मेहबुब अली सय्यद नावाचा व्यक्ती म्हणाला की, मलाही थोडं थोडं मराठी येतं, मी देखील मराठी शिकतोय…महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी यायलाचं हवं. राज ठाकरे म्हणताय, ते अगदी बरोबर आहे, असंही मेहबुब अली सय्यद म्हणाले.

तामिळनाडूमधील नागरिक काय म्हणाला?

राज ठाकरेंच्या सभेला उपस्थित असणारा तामिळनाडूमधील व्यक्ती म्हणाला की, आमच्या तामिळनाडूमध्ये गेलात की तेथील लोक नेहमी तामिळ भाषेतच बोलतात, कधीही हिंदीत बोलत नाही. महाराष्ट्र माझं कर्मभूमी आहे. महाराष्ट्राने मला खूप काही दिलं, त्यामुळे मी मराठी विसरणार का?, महाराष्ट्रात मराठी बोललीच पाहिजे, असं तामिळनाडूमधील सदर नागरिक म्हणाला.

https://www.youtube.com/watch?v=U5PCZ-730HW

संबंधित बातमी:

राज ठाकरेवरील निशिकांत दुबे: राज ठाकरे महनाले, मुंबईच्या समुद्रावर आदळतील; निशिकांत दुबांची प्रथम प्रतिसाद

आणखी वाचा

Comments are closed.