होय, ‘सावली बार’ माझ्या पत्नीच्या नावावर, पण…; अनिल परबांच्या आरोपानंतर रामदास कदमांची पहिली
मुंबई: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session 2025) शेवटच्या दिवशी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर गंभीर आरोप केला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम (Jyoti Kadam) यांच्या नावे कांदिवलीतील सावली डान्सबार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी या बारवर धाड टाकून 22 बारबाला ताब्यात घेतल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. “डान्सबारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे?” असा सवाल देखील अनिल परब यांनी उपस्थित केला, या घटनेने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावरती शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार रामदास कदम यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे.
तो माझ्या पत्नीच्या नावावर आहे….
अनिल परब हे अर्धवट वकील आहेत. अर्धवट वकिलांचा सल्ला घेऊन नेहमी उद्धव ठाकरे चालतात म्हणूनच उद्धव ठाकरेंची ही परिस्थिती झाली आहे. सावली बारबाबत स्पष्टता देताना म्हणाले, सावली बार शेट्टी नावाचा इसम चालवतो. हे वास्तव आहे की तो माझ्या पत्नीच्या नावावर आहे. तिथे एक प्रसंग घडला, तिथे त्या इसमाने एका मुलीवर पैसे उधळले. त्यानंतर मी सर्व लायसन्स पोलीसांकडे जमा केले. रामदास कदम म्हणून कुठेही बदनाम करता येत नाही, यासाठी हे सर्व सुरू आहे. आम्ही पाहतो आहोत की, अनिल परब याच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करता येतो का असंही पुढे रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
चालक जबाबदार असतो, मालक जबाबदार नसतो
सावली बारचा विषय आहे तो गेल्या 30 वर्षांपासून शेट्टी नावाचा एक इसम आहे, तो आमचा सावली बार चालवतो. हे वास्तव आहे. माझ्या पत्नीच्या नावाचा लायसन्स आहे. पण त्याचं ऑर्केस्ट्राचं लायसन्स आहे. मुलींचं, वेटरचं लायसन्स आहे, ते अनधिकृत नाही. तिथे डान्स चालत नाही. मात्र, मला एक गोष्ट कळली ती अशी आहे की, एका कस्टमरने एका मुलीवरती पैसे उधळले होते, ती गोष्ट जेव्हा मला कळली तेव्हा मी पोलिसांना तत्काळ ऑर्केस्ट्राचं लायसन्स, त्या मुलींचे लायसन्स पोलिसांना पुन्हा सबमिट करून टाकले. ते हॉटेल बंद करून टाकलं अशा घाणेरड्या पैशांची आम्हाला आवश्यकता नाही. आम्ही सक्षम आहोत, देवाने आम्हाला सगळं दिलं आहे. पण आमच्यावरती जे आरोप केले गेले, ते बेछुट आहेत, मला वाटतं, तुमचे अर्धवट वकील आहेत, त्यांना अद्याप अॅक्ट माहिती नाहीत, कायदा माहिती नाही. कायद्यामध्ये दिले आहे, जर एखाद्या इसमाला ते चालवण्यासाठी दिले असेल तर तो चालक जबाबदार असतो, मालक जबाबदार नसतो, असंही पुढे रामदास कदम म्हणालेत.
योगेश कदम याला राजकीय पध्दतीने संपवण्याचा प्रयत्न केला….
त्यांना कायद्याबाबत माहिती नाही, अर्धवट माहिती घेतात फक्त आणि बोलतात. आम्ही या प्रकरणी अनिल परब यांच्यावरती अब्रूनुकसानीचा दावा करता येतो का हे पाहतं आहोत. आम्ही पडताळत आहोत, यांनी आधी माझ्या मुलाला योगेश कदम याला राजकीय पध्दतीने संपवण्याचा प्रयत्न केला, आता जर का कोणी आमची विधीमंडळात चुकीची माहिती देऊन, चुकीचे अॅक्ट सांगूनबदनामी करत असेल किंवा बदनामी करत असेल तर मी पत्राद्वारे अध्यक्षांकडे कारवाईची मागणी करणार असल्याचं रामदार कदम यांनी म्हटलं आहे. त्यांचं स्वप्न कधीही साकार होणार नाही, तर आम्ही चुकीचं काही करणार नाही, असंही पुढे कदम यांनी म्हटलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=L4auvgpkjg8
आणखी वाचा
Comments are closed.