IND vs ENG: करुण नायरवर ‘या' भारतीय खेळाडूचा संताप, जाणून घ्या काय म्हणाला
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत जवळपास 3000 दिवसांनंतर करुण नायरने (Karun Nair) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. घरेलु क्रिकेटमध्ये चांगल्या धावा केल्या होत्या, त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण इंग्लंडमधील या मालिकेत करुण मोठी खेळी करण्यात आतापर्यंत अपयशी ठरला आहे.
या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत आतापर्यंत तीन सामने झाले असून, त्यात करुण नायरने सुमारे 22 च्या सरासरीने 131 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्तम खेळी 40 धावांचा राहिली आहे. काही डावांमध्ये त्याने चांगली सुरुवात केली, पण त्याचा फायदा घेता आला नाही. त्यामुळेच फारुख इंजिनिअर त्याच्या कामगिरीवर नाराज आहेत.
फारुख इंजिनिअर म्हणाले (Farokh Engineer) , करुणने काही चांगले 20-30 धावांचे डाव खेळले, सुंदर कव्हर ड्राईव्ह्ज मारले, पण नंबर 3 फलंदाजाकडून फक्त 30 धावांची अपेक्षा नसते. तुम्ही जरी फार चांगले खेळलात तरी शतक लागत नसेल, तर तो खेळ उपयोगाचा नाही. बोर्डावर धावा लागतात. मोठी खेळी हवी. नंबर 3 ही जबाबदारीची जागा आहे आणि अपेक्षा खूप जास्त असतात.
करुण नायरच्या अपयशानंतर इंजिनिअर यांनी टीम इंडियाला सल्ला दिला आहे की, साई सुदर्शनचे (Sai surdarshan) वय पाहू नये. जर तो चांगला खेळाडू असेल, तर त्याला मॅंचेस्टर कसोटीत खेळवावं.
ते पुढे म्हणाले, आपल्याला सध्या सर्वोत्तम 11 खेळाडूंची निवड करावी लागेल. मी साई सुदर्शनला फारसं पाहिलं नाही, पण प्रश्न असा आहे की कोण तुमच्यासाठी जास्त योगदान देईल? तुम्ही भारतासाठी खेळता, तुमची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे वय विसरून, जो चांगला खेळेल त्याला संधी द्या. कारण हा सामना जिंकणे गरजेचे आहे.
Comments are closed.