8 संघ, 15 सामने! शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या आशिया कपमध्ये या तारखेला भारत-पाक महामुकाबला; पाहा संपूर्ण वेळापत्रक

सप्टेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आशिया कप ट्रॉफी जिंकून सलग दुसऱ्यांदा आशिया चॅम्पियन होण्याचा गौरव मिळवला. अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानला पराभूत करत मालिकेत आपली ताकद सिद्ध केली. या विजयामुळे भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि संघाच्या कामगिरीची प्रशंसा सर्वत्र झाली.

आता क्रिकेट विश्वाचे लक्ष 14 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या एसीसी मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स टी 20 स्पर्धेकडे आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ भाग घेत आहेत. ज्यामध्ये 15 सामने खेळले जातील. अंतिम सामना 23 नोव्हेंबरला होणार असून, त्या सामन्यात विजेता ठरवला जाईल.

स्पर्धेतील 8 संघांना दोन गटांमध्ये विभागण्यात आले आहे. ए ग्रुपमध्ये हाँगकाँग, बांगलादेश ए, अफगाणिस्तान ए आणि श्रीलंका ए आहेत, तर बी ग्रुपमध्ये ओमान, यूएई, पाकिस्तान ए आणि भारत ए संघ आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील, जिथून अंतिम सामन्यात विजेत्याची कबोल होईल.

स्पर्धेतील सामने प्रेक्षकांना पाहण्यासाठी सोयीस्कर ठरतील. टीव्हीवर हे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित होतील, तर मोबाईलवर चाहते सोनी लिव्ह APP वर सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. यामुळे चाहत्यांना कोणत्याही ठिकाणाहून क्रिकेटचा थरार अनुभवता येईल.

14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान स्पर्धेत दररोज दोन सामने खेळले जातील. सलग सहा दिवस डबल हेडरचा थरार चाहत्यांना पाहायला मिळेल, ज्यामुळे टी 20 क्रिकेटचा अनुभव अधिक उत्साहपूर्ण बनेल.

स्पर्धेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा सामना 16 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व जितेश शर्मा करणार असून, या महामुकाबल्याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले आहे.

Comments are closed.