सरकारला महाराजांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान वाटत नाही का? कोरटकरच्या अटकेवरून रोहित पवारांचा सवाल

प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याची धमकी दिली. मात्र अद्यापही त्याला अटक करण्यात आलेली नाही. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.
X वर एक पोस्ट करत रोहित पावर म्हणाले आहेत की, ”छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेल्या कोरटकरला अटक करण्यास पोलीस इतका उशीर का लावत आहेत? तोच कोरटकर जर एखाद्या भाजपच्या वरिष्ठ नेत्याबाबत खालच्या पातळीवर बोलला असता तर, त्याला पोलीसांनी अटक केली नसती का? या सरकारला महाराजांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान वाटत नाही का? असा सवाल त्यांनी महायुती सरकारला विचारला आहे.
रोहित पवार म्हणाले आहेत की, ”सत्तेच्या राजाश्रयामुळे कोरटकर वाचवलं जातंय, हे आता लपून राहीलेलं नसून कोरटकरला खुद्द सरकारचंच संरक्षण प्राप्त असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. शिवाय कोल्हापूर पोलीस अटकेसाठी गेले असता नागपूर पोलीसांनी सहकार्य न करता कोरटकरला लपवण्याची भूमिका घेतली, अशीही माहिती पुढं येत आहे. सरकारने यावर खुलासा करावा.”
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलेल्या कोरटकरला अटक करण्यास पोलीस इतका उशीर का लावत आहेत? तोच कोरटकर जर एखाद्या भाजपच्या वरिष्ठ नेत्याबाबत खालच्या पातळीवर बोलला असता तर त्याला पोलीसांनी अटक केली नसती का? या सरकारला महाराजांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान वाटत नाही…
– रोहित पवार (@rrpspeaks) 27 फेब्रुवारी, 2025
Comments are closed.