IND vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध रोहित शर्मासाठी अग्निपरीक्षा; अपयशी ठरल्यास वाढणार अडचणी!

अफगाणिस्तानविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर आता टीम इंडिया वनडे मालिकेच्या तयारीला लागली आहे. (IND vs AFG) या मालिकेत टीम मॅनेजमेंटसमोर काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे त्यांना शोधायची आहेत. यात अष्टपैलू हार्दिक पांड्याची (Hardik pandya fitness) फिटनेस हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. यासोबतच, कर्णधार शुबमन गिल (Shubman gill and Head Coach Gautam Gambhir) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना रोहित शर्माच्या फॉर्मबाबतही स्पष्टता हवी आहे, जेणेकरून भविष्यातील संघनिवडीबाबत मोठे निर्णय घेता येतील. रोहित शर्मासाठी (Rohit Sharma) ही वनडे मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर सर्वांना वाटले होते की, रोहित शर्माच्याच नेतृत्वाखाली टीम इंडिया 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळेल. मात्र, त्यानंतर परिस्थिती बदलली आणि शुबमन गिलकडे वनडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. तेव्हापासून प्रत्येक मालिकेत रोहित शर्मावर चांगली कामगिरी करण्याचे मोठे दडपण आहे. न्यूझीलंडविरुद्धची मागील मालिका रोहितसाठी विशेष चांगली राहिली नव्हती. आता जर तो अफगाणिस्तानविरुद्धच्या तिन्ही वनडे सामन्यांत अपयशी ठरला, तर त्याला संघातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. टीम मॅनेजमेंट सध्या रोहितसाठी पर्याय (बॅकअप) तयार करण्यावर भर देत आहे.

रिपोर्टनुसार, कर्णधार शुबमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर हे यशस्वी जयस्वालला (Yashsvi jaiswal) दुसरा सलामीवीर म्हणून तयार करत आहेत. मागील वनडे सामन्यात यशस्वीने शतक झळकावून आपली क्षमता सिद्ध केली आहे, त्यामुळे मॅनेजमेंटला तो आता तयार वाटत आहे. जर रोहित शर्माला वनडे क्रिकेटमध्ये सातत्याने धावा काढता आल्या नाहीत, तर त्याला संघाबाहेर काढले जाऊ शकते. अशा परिस्थितीत शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी सलामीला दिसू शकते, तर ईशान किशनला (Ishaan kishan) तिसरा पर्याय म्हणून संघात ठेवले जाण्याची शक्यता आहे.

Comments are closed.