उत्तम मोहितेंवर वार करताना शाहरुखच्या पायाला चाकू लागला, नस कापताच भळाभळा रक्त वाहू लागलं अन्..
सांगली क्राईम न्यूज: सांगलीच्या गारपीर चौकात मंगळवारी रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. सांगलीतील दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांची एका गुंडांच्या टोळक्याने निर्घृणपणे हत्या (Murder News) केली. उत्तम मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यासाठी गारपीर चौक परिसरातील उत्तम मोहिते (Uttam Mohite Murder) यांच्या घराच्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत मांडव टाकून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आठ जणांच्या टोळक्याने चाकू, लोखंडी रॉड, काठी आणि धारदार शस्त्रांनी वार करुन उत्तम मोहिते यांची हत्या केली. गणेश मोरे, सतीश लोखंडे, शाहरूख शेख, बन्या उर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे आणि समीर ढोले अशी या आठ आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण सांगली शहरातील इंदिरानगर भागात राहणारे आहेत. (Sangli News)
आठ जणांचे हे टोळके उत्तम मोहिते यांचा वाढदिवस असलेल्या ठिकाणी गेले. याठिकाणी मोहिते यांनी आपले मित्र आणि नातेवाईकांसाठी जेवण ठेवले होते. गणेश मोरे आणि त्याचे टोळके याठिकाणी आले. त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आत सोडण्यावरुन वाद झाला. उत्तम मोहिते यांच्या पुतण्याने गणेश मोरे याला समजवण्याचा प्रयत्न केला. गणेश मोरे याने थोड्यावेळाने त्याचे मित्र सतीश लोखंडे, शाहरूख शेख, बन्या उर्फ यश लोंढे, अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे, समीर ढोले यांचेसह चाकू, लोखंडी रॉड, धारदार हत्यारे व काठी घेवुन फिर्यादीचे घरात शिरून फिर्यादीचा नवरा उत्तम जिन्नाप्पा मोहिते (वय 38 वर्षे), यांचे पोटात, छातीवर, कानावर, डोक्यात, हातावर वार करुन गंभीर जखमी करून खुन केला आहे. तसेच त्यांची भांडणे सोडविण्यास फिर्यादीचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते (वय 21 वर्षे), (रा. सितारामनगर, एसटी स्टॅन्डजवळ सांगली) हा मध्ये गेला असता त्यालाही जिवंत ठेवत नाही, असे म्हणुन त्याच्या छातीवर गणेश मोरे याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे, असे पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
उत्तम मोहिते यांच्यावर आरोपींनी चाकु, लोखंडी रॉड, धारदार हत्यारे व काठीने हल्ला केला. त्यांनी मोहिते यांच्या घरात घरात शिरून त्यांच्या पोटात, छातीवर, कानावर, डोक्यात, हातावर वार करून गंभीर जखमी करून खुन केला आहे. तसेच त्यांची भांडणे सोडविण्यास फिर्यादीचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते वय 21 वर्षे, रा सितारामनगर, एस टी स्टॅन्ड जवळ सांगली हा मध्ये गेला असता त्यालाही जिवंत ठेवत नाही असे म्हणुन त्याचे छातीवर गणेश मोरे याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
Sangli news: उत्तम मोहितेंवर वार करताना चाकू शाहरुखच्या पायावर लागला, नस कापल्याने भळाभळा रक्त वाहिलं अन् मृत्यू
या घटनेत उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला करणाऱ्या टोळक्यातील शाहरुख शेख या आरोपीचाही मृत्यू झाला. शाहरुख शेख हा मोहिते यांच्यावर वार करत असताना त्याच्या पायाला चाकू लागला. त्यामुळे त्याच्या पायाची नस कापली गेली. त्यामुळे शाहरुखच्या पायातून प्रचंड रक्तस्राव झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्याचाही मृत्यू झाला. यानंतर सांगली पोलिसांनी नागरिकांना गैरसमज आणि अफवा पसरवू नयेत, असे आवाहन केले आहे. आरोपी आणि मयत यांच्या जुनं भांडण होते. याच वादातून हा हल्ला करण्यात आला. सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद झाली आहे. आरोपी गणेश मोरे याच्याबद्दल सखोल तपास केल्यावर आणखी माहिती समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, उत्तम मोहिते यांच्या मुलीने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. गणेश मोरे या परिसरात गुंडगिरी करत होता. काल त्याने माझ्या वडिलांची हत्या केल्यानंतर सिव्हिल रुग्णालयात माझ्या भावावरही हल्ला करण्यात आला. मात्र, त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती, असा आरोप उत्तम मोहिते यांच्या मुलीने केला.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.