Sangli News – एकाच कुटुंबातील चौघांनी जीवन संपवले, मृतदेहाशेजारी कापलेले लिंबू

सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याची घटना घडली. मृतदेहाशेजारी कापलेले लिंबू आणि सुरी आढळून आली आहे. यावरून जादूटोण्यातून ही घटना घडली असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. यात सासू आणि सुनेचा मृत्यू झाला असून पिता-पुत्राची प्रकृती गंभीर आहे.
रमेजा अल्लाउद्दीन पाटील, काजल समीर पाटील अशी मयत सासू-सुनेची नावं आहेत. तर अल्लाउद्दीन मकबूल पाटील आणि समीर अल्लाउद्दीन पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे. पाटील कुटुंब गेल्या 15 दिवसांपासून दडपणाखाली होते, असे प्राथमिक तपासात कळते. घटनेची माहिती मिळताच जत आणि कवठेमहंकाळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.
कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावात पाटील कुटुंब राहते. कुटुंबातील एका वयोवृद्ध महिलेला शनिवारी सकाळी घरातील चौघेजण निपचिप पडलेले आढळून आले. महिलेने आरडाओरडा केला असता शेजारी धावून आले. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी मृतदेहांशेजारी चार ग्लास, कापलेले लिंबू, सुरी आणि विषारी औषध आढळून आले. यावरून चौघांनी विषारी औषध प्राशन केले असावा असां अंदाज पोलिसांनी वर्तवला. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments are closed.