राजेश एक्स्पोर्टस् घोटाळा प्रकरणात संजय राऊतांनी किरीट सोमय्यांना पत्र धाडलं; म्हणले, जोरदार..
संजय राऊत: सध्या देशभरात गाजत असलेल्या राजेश एक्स्पोर्टस् आणि त्यातील संशयित राजेश मेहता प्रकरणात (Rajesh Exports scam) 15.15 लाख कोटींचा घोटाळा, सरकारची फसवणूक याबाबत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आवाज उठवावा, यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी किरीट सोमय्या यांच्या समोर काही मुद्दे मांडत या सगळ्या विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले आहे. (Sanjay Raut on राजेश निर्यात घोटाळा)
Sanjay Raut: सेबी, केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून निष्पक्ष चौकशी, फॉरेन्सिक ऑडिटची मागणी करा
ज्यामध्ये राजेश मेहता-राजेश एक्स्पोर्टस् प्रकरणात तातडीने आणि जोरदार आवाज उठवा. आपल्या पक्षांच्या खासदारांना या घोटाळ्याबाबत मार्गदर्शन करा. संसदेत किंवा सार्वजनिक व्यासपीठावर हा मुद्दा उपस्थित करा. असे त्यांना सुचवण्यात आले आहे. सेबी, केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांकडून निष्पक्ष चौकशी, फॉरेन्सिक ऑडिटची मागणी करा. PLI प्रकल्पाच्या निवडीची समीक्षा आणि गरज पडल्यास प्रकल्प रद्द करून घ्या. गुंतवणूकदारांच्या (विशेषतः एलआयसी पॉलिसीधारकांच्या) पैशांचे संरक्षण आणि नुकसान भरपाईची व्यवस्था करण्याची मागणी करा. मागणी मान्य झाली नाही तर एलआयसी मुख्यालयासमोर उपोषण करा. असा सल्लाहे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
भ्रष्टाचारा विरुद्ध चिंतन! pic.twitter.com/BhhSUInzyT
— संजय राऊत (@rautsanjay61) 9 जून 2026
Sanjay Raut on Kirit Somaiya: …नाहीतर पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे धरा, आपल्या भूमिकेत सुसंगतता असणे गरजेचं
जबाबदार अधिकाऱ्यांवर आणि संस्थांवर कारवाईची मागणी करा, नाहीतर पंतप्रधान कार्यालयासमोर धरणे धरा. भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई ही केवळ विरोधकांविरुद्ध किंवा निवडक प्रकरणांत नसावी, तर ती सत्य आणि पारदर्शकतेच्या बाजूने, कोणत्याही दबावाशिवाय असावी. आपल्या भूमिकेत ही सुसंगतता असणे गरजेचे आहे. असेही संजय राऊत म्हणाले,
Rajesh Exports scam: राजेश एक्सपोर्टस सेबीच्या निशाण्यावर; 15.15 लाख कोटीचा अपहार झाल्याच्या अहवालात उल्लेख
सोने चांदीच्या रिफानिंगच्या उद्योगात असलेली सर्वात मोठी कंपनी राजेश एक्सपोर्टस सध्या सेबीच्या निशाण्यावर आहे. सेबीनं राजेश एक्सपोर्टसमध्ये गेल्या 15.15 लाख कोटी रुपयांचा अपहार झाल्याच्या उल्लेख अंतरिम अहवालात केल्यानं खळबळ उडाली आहे. राजेश एक्स्पोर्टसकडून आर्थिक वर्ष 2021-25 मध्ये 15.15 लाख कोटींची अपहार केल्याचा ठपका सेबीकडून ठेवण्यात आला आहे. यानंतर या कंपनीच्या स्टॉकमध्ये घसरण सुरु आहे. राजेश एक्सपोर्टस 1995 मध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली. गेल्या तीन वर्षात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 90 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या कंपनीचा शेअर 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर आला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या दहा वर्षात म्युच्युअल फंड आणि इतर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी राजेश एक्सपोर्टसमधील गुंतवणूक कमी केली असली तरी दुसरीकडे एलआयसीनं मात्र पाच पट गुंतवणूक वाढवली.
राजेश एक्सपोर्ट्स: राजेश एक्सपोर्ट्सची खरी भूमिका आहे
राजेश एक्स्पोर्टसनं सेबीनं केलेले आरोप फेटाळले आहेत. कंपनीकडून दाखवण्यात आलेलं उत्पन्न बरोबर असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. वाल्कैम्बीचं उत्पन्न मोजण्याऐवजी सेबीकडून EBIDTA ग्राह्य धरला गेल्यानं संभ्रम निर्माण झाल्याचं राजेश एक्स्पोर्टसनं म्हटलं. तर, वाल्कैम्बी ही स्वित्झरलँडमधील सोन्याची रिफायनरी 2015 मध्ये 400 दशलक्ष अमेरिकन डॉलर्समध्ये खरेदी केली होती.
अभिजीत दिपके झुरळ जनता पार्टी पीसी : आता मी एक नाही, लाखो तरुण माझ्यासोबत आहेत : अभिजीत दिपके
Comments are closed.