शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांना मोठा झटका, मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाख
संतोष बांगर: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होत असताना हिंगोलीतील कळमनुरी येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) मोठ्या वादात सापडले आहेत. मतदान केंद्रातच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर झाला असून या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनीही संतोष बांगरांना कठोर शब्दांत सुनावले आहे, तर आता संतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
हिंगोली शहरातील मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक ३ येथे सकाळी संतोष बांगर मतदानासाठी पोहोचले. तेव्हा त्यांनी महिला मतदाराला ईव्हीएमवर बटन दाबण्याबाबत सांगितले. तसेच मतदान केंद्रात “स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो” आणि “एकनाथ शिंदे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं” अशी घोषणाबाजी केली. मोबाइल फोनचा देखील वापर केला. मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे, फोन वापरणे किंवा मतदाराला मतदानाविषयी निर्देश देणे हे सर्वच कृती गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचा गंभीर उल्लंघन मानले जाते. त्यामुळे संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत होती.
Santosh Bangar: संतोष बांगरांवर गुन्हा दाखल
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणात चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचे आढळल्यास संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, याबाबत अहवाल मागवण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली होती. आता या प्रकरणात आमदार संतोष बांगरांना मोठा झटका बसलाय. संतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Devendra Fadnavis on Santosh Bangar: फडणवीसांनी संतोष बांगरांना फटकारले
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष बांगरांना कठोर शब्दांत फटकारले. “किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. निवडणुकीत आपण कसं वागतोय, आपण कोणता संदेश देतोय याचा विचार केला पाहिजे, ” असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संतोष बांगर यांना सुनावले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.