रक्त सांडू पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, कोल्हापूरमध्ये विराट जनआंदोलनात मोर्चेकऱ्यांचा

शक्तीपीठ एक्सप्रेस वे कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विरोध आणि टीकेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या शक्तीपीठ महामार्गाचा (Shaktipeeth Mahamarg) विरोध करण्यासाठी मंगळवारी कोल्हापूरमध्ये आंदोलन केले जात आहे. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आंदोलकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये छत्रपती शाहू महाराज, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil) हे सहभागी झाले आहेत. या मोर्चासाठी ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. “आम्हाला आत्महत्या करायला लागली तरी चालेल, आमचे रक्त सांडलं तरी चालेल, मात्र आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही”, अशी ठाम भूमिका आंदोलनातील महिलांनी घेतली आहे. या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या (Kolhapur District) कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी एकटवले आहेत. आमच्या जमिनी विकल्यानंतर आमच्या पोरा-बाळांची लग्न कशी होणार, असा सवाल देखील महिलांनी उपस्थित केला आहे. (Shaktipeeth Mahamarg agitation)

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सतेज पाटील यांनी म्हटले की, आंदोलक आणि शेतकऱ्यांना नको असलेला शक्तिपीठ महामार्ग करु नये. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा मार्ग होऊ देणार नाही. शक्तीपीठ महामार्गाला समांतर असा नागपूररत्नागिरी मार्ग आहे. मग असे असताना नव्या मार्गाची गरज काय? सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात अनेक अल्पभूधारक शेतकरी आहेत. हे सगळे शेतकरी शक्तीपीठ महामार्ग झाल्यास भूमिहीन होतील. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा आणि महापूराचा तडाखा बसतो.  शक्तीपीठ महामार्ग झाल्यास महामार्गामुळे अनेक हेक्टर शेती उद्ध्वस्त होईल. या महामार्गामुळे 73 ते 76 गावांमधील शेतजमीन जाणार आहे.

Sangli Shakit Peeth: सांगलीच्या विटाजवळ शक्तिपीठ महामार्गच्या ड्रोन मोजणी शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

सांगली जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग साठी होणाऱ्या ड्रोन मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. खानापूर  तालुक्यातील विटा जवळील नागेवाडी, माऊली भाग्यनगर येथील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या ड्रोन मोजणीस  विरोध दर्शवला आहे. शेतकरी आणि मोजणी अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आणि नंतर मोजणी बंद पाडली गेलीं. त्यानंतर प्रांताधिकारी विक्रम सिंह बादल आणि तहसीलदार योगेश टोणपे यांनी  शेतकऱ्यांशी  चर्चा केली. मात्र आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको आहे तर ड्रोन मोजणी कशाला करताय असा सवाल उपस्थित करत ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला.,यावेळी बाधित शेतकरी आणि मोजणी अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक देखील उडाली.

Shakti Peeth Route: कोणत्या जिल्ह्यामंधून जाणार होता शक्तिपीठ महामार्ग?

विदर्भातील वर्धा ते कोकणातील बांधापर्यंत एकूण 805 किलोमीटरचा शक्तिपीठ महामार्ग असणार आहे.  राज्यातील वर्धायवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूरधाराशिव, सोलापूरसांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. हा महामार्ग सहा पदरी असेल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील. शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा  खर्च येणार आहे.

Shakti Peeth: कोणत्या देवस्थानांना हा महामार्ग जोडणार?

कोल्हापूर – अंबाबाई, तुळजापूर – तुळजाभवानी. नांदेड – माहूरची रेणुका देवी या तीन शक्ती पीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. परळी वैजनाथ,  हिंगोली जिल्ह्यातील  औंधा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.

Shakti Peeth: महामार्गासाठी किती जमीन लागणार?

या महामार्गामुळे बारा जिल्ह्यातील 27 हजार 500  एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे. त्यामुळे  शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत.  ठेकेदारांची शक्ती वाढवण्यासाठी गरज नसताना महामार्गाचा घाट घातल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.  हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळनांदेड, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग येथे संपणार आहे.

Kolhapur and Sangli Farmers: शेतकऱ्यांचा  महामार्गाला आक्षेप का?

  • रस्त्यातील डोंगर पोखरून बोगदे निर्माण केले जाणार, अनेक ठिकाणी भर घालून छोट्या नद्या-नाले  बुजवले जाणार.
    शेतकऱ्यांबरोबर पर्यावरणाचाही विध्वंस होणार
  • सध्याच्या जमिनी या आमच्या जगण्याचे एकमेव साधन आहे. विशेषत: जमिनी यापूर्वीच गुंठ्यावर आल्या आहेत. आता जमिनी संपादित केल्यास शेतकरी अल्पभूधारक अथवा भूमीहीन होऊ शकतो.
  • काही जमिनी या बारमाही बागायती आहेत तर काही भविष्यात एनए प्रयोजनाच्या आहेत. विमानतळ, रेल्वे स्थानक, रेल्वे कोच कारखाना, साखर कारखाना, औद्योगिक वसाहतीपासून जवळच्या अंतरावर जमिनी आहेत. त्यामुळे जमिनीचे मूल्य दिवसेंदिवस वाढत आहे. या जमिनी संपादित

आणखी वाचा

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग नेमका कुठून कुठे, विरोध का, खर्च किती, महत्त्वकांक्षी प्रकल्पाची A टू Z माहिती!

Comments are closed.