सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचं 5 दिवसात 94 हजार कोटींचं नुकसान, 4 कंपन्या फायद्यात

सामायिक बाजार अद्यतन नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्सवरील टॉप 10 कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं. टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचं 5 दिवसात 94433.12 कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं. सर्वाधिक नुकसान टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचं नुकसान झालं. 14 ते 18 जुलै पाच दिवसांच्या काळात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवरील 30 शेअरचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये 742.74 अंकांनी घसरलं.  रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस, भारती एअरटेल, इन्फोसिस आणि हिंदुस्तान यूनिलीवरचं बाजार मूल्य घसरलं. आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक (एसबीआई), बजाज फायनान्स आणि भारतीय जीवन बीमा निगम (एलआयसी)  या कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं.

सहा कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं

14 ते 18 जुलै या काळात टीसीएसचं बाजारमूल्य  27,334.65 कोटी रुपयांनी घसरुन 11,54,115.65 कोटी रुपयांवर आलं. या पाच दिवसात सर्वाधिक नुकसान टीसीएसचं झालं.

रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजारमूल्य 24,358.45 कोटी रुपयांनी घसरुन 19,98,543.22 कोटी रुपयांवर आलं.

एचडीएफसी बँकेचं बाजारमूल्य  20,051.59 कोटी रुपयांनी घसरुन 15,00,917.42 कोटी रुपयांवर आलं आहे.

भारती एअरटेलचं बाजारमूल्य  11,888.89 कोटी रुपयांनी घसरलं आणि ते 10,83,998.73 कोटी रुपयांवर आलं आहे.

हिंदुस्तान यूनिलीवरचं बाजारमूल्य 7,330.72 कोटी रुपयांनी घसरुन 5,84,789.77 कोटी रुपयांवर आलं आहे.

इन्फोसिसचं बाजारमूल्य 3,468.82 कोटी रुपयांनी कमी होऊन 6,59,096.12 कोटी रुपये इतकं झालं.

चार कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं

सेन्सेक्समधील टॉप 10 पैकी 4 कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचं बाजारमूल्य 13,208.44 कोटी रुपयांनी वाढून 7,34,763.97 कोटी रुपयांवर आलं.

बजाज फायनान्सचं बाजारमूल्य देखील या पाच दिवसात वाढलं आहे. बजाज फायनान्सचं बाजारमूल्य 5,282.15 कोटी रुपयांनी वाढून 5,85,292.83 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे.

आयसीआयसीआय बँकेंचं बाजारमूल्य 3,095 कोटी रुपयांनी वाढून 10,18,008.73 कोटी रुपये इतकं झालं.

एलआयसीचं बाजारमूल्य 506 कोटी रुपयांनी वाढून 5,83,828.91 कोटींवर पोहोचलं आहे.

सेन्सेक्सवरील टॉप 10 कंंपन्यांमध्ये बाजारमूल्यानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर कायम आहे. एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, हिंदुस्तान यूनिलीवर आणि एलआयसीचा क्रम आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.