“हिटमॅन रोहितबद्दल शिखर धवनने सांगितली अनोखी गोष्ट, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!”
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत शानदार प्रदर्शन केलेलं आहे. भारतीय संघाने बांगलादेश आणि पाकिस्तान संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत त्यांची जागा पक्की केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यावर आहे. मागच्या वर्षी भारतीय संघाने टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. तत्पूर्वी रोहित शर्माचा मित्र आणि खूप काळ त्याच्यासोबत भारतीय संघासाठी सलामीवीर म्हणून खेळत खेळलेला भारतीय माजी फलंदाज शिखर धवनने रोहित शर्मा बाबत मन जिंकणार एक वक्तव्य केलं आहे.
शिखरच म्हणणं आहे की, रोहित शर्मा मागच्या काही वर्षांपासून कर्णधार पदासाठी एकदम योग्य खेळाडू आहे. शिखरचं रोहित शर्मा सोबत आणि अन्य खेळाडूंसोबत चांगलं नातं आहे. रोहित सोबत सलामीवीर म्हणून खेळलेला शिखर म्हणाला की, मुंबईचा हा फलंदाज भारतीय संघ सांभाळण्यासाठी खूप अनुभवी आहे. तसेच रोहितने बांगलादेश विरुद्ध 41 तर पाकिस्तान विरुद्ध 20 धावा केल्या होत्या.
शिखर धवनने स्टार स्पोर्ट्स आणि जिओहॉटस्टार वरील “द शिखर धवन एक्सपिरीयन्स” या विशेष कार्यक्रमांमध्ये म्हटले, 2013 पासून 2025 पर्यंत 12 वर्षांचा अनुभव खूप आहे. रोहितने खूप काही बघितले आहे. त्याला माहिती आहे की दबावाच्या स्थितीमध्ये कशाप्रकारे काम केलं पाहिजे. तो एक कर्णधार म्हणून भारतीय संघासाठी एकदम योग्य आहे. शिखर धवनने 2013 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी वर देखील भाष्य केले. त्याने नऊ वर्ष रोहित शर्मा सोबत सलामीवीर म्हणून भागीदारी केली आहे. तसेच त्यावेळी रोहित सोबत सलामीवीर म्हणून मी खेळावे हा निर्णय सामन्याच्या आदल्या दिवशी धोनीने घेतला होता.
शिखर धवनने रोहित आणि त्याच्या मधल्या मैत्रीचे काही किस्से सांगितले. तो म्हणाला माझी आणि रोहितची मैत्री जूनियर क्रिकेटच्या दिवसापासून आहे. आमचा एकमेकांवर विश्वास आहे आणि आमचं नातं मैदानावर आणि मैदानाबाहेरही एकच आहे.
हेही वाचा
चॅम्पियन्स ट्रॉफीमधून पाकिस्तानची गच्छंती, लज्जास्पद विक्रमाची नोंद!
“विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर पाठवलेल्या मेसेजबाबत धोनीने केला मोठा खुलासा!”
पाकिस्तानच्या यजमानपदाचा फज्जा, स्पर्धेत ना विजय, ना सन्मान; रिकाम्या हाताने घरी!
Comments are closed.