गद्दार आमदार संतोष बांगरांकडून गोपनीयतेचा भंग, नियमांची पायमल्ली करत महिला मतदाराला कुठलं बटण दाबायचं ते दाखवलं

मिंधे गटाचे नाटकी गद्दार आमदार संतोष बांगर यांनी गोपनीयतेचा भंग केला आहे. संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात अनधिकृत रित्या मोबाईल वापरत मतदान करत असलेल्या एका महिलेला हात वारे करत मतदान करण्याचा इशारा केला. एवढेच नाही तर घोषणाबाजी केल्याचाही प्रकार घडला आहे.
मिंधे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर यांचा बालेकिल्ला असलेल्या वंजारवाड्यातील शेतकरी भवनसमोर मतदानाच्या पूर्वसंध्येला एक कोटींहून अधिक रुपयांची रोकड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पकडल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.
दरम्यान, मंगळवारी 2 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशी आमदार संतोष बांगर हे मतदान करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी अनधिकृत रित्या मोबाईलचा वापर करत मतदान करत असलेल्या एका महिलेला हात वारे करत मतदान करण्याचा इशारा केला आणि घोषणाबाजी करत मतदान केल्याचा प्रकार घडला. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.
शिंदे गटाचे गद्दार आमदार संतोष बांगर यांच्याकडून गोपनीयतेचा भंग, नियमांची पायमल्ली करत महिला मतदाराला कुठलं बटण दाबायचं ते दाखवलं pic.twitter.com/hZUQ0yKUle
— सामना ऑनलाइन (@SaamanaOnline) 2 डिसेंबर 2025
कारवाई केली जाणार
मतदान केंद्रात आमदार संतोष बांगर यांनी मतदान करताना अनधिकृत रित्या मोबाईलचा वापर करत एका महिलेला हात वारे करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अनुषंगाने गोपनीयतेचा भंग बाबत केंद्राध्यक्ष यांच्याकडून अहवाल मागून पुढील कारवाई केली केली जाणार असल्याचे हिंगोलीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी सांगितले.

Comments are closed.